Gold Silver Rate Today : वाढता वाढता वाढे, सोने-चांदी मोडणार रेकॉर्ड, जाणून घ्या ताजा भाव

| Updated on: Oct 27, 2023 | 8:33 AM

Gold Silver Rate Today : सोन्याने या आठवड्यात चांगलीच मजल मारली. तर गेल्या महिनाभरात विक्रमी उसळी घेतली. चांदीचे तळ्यातमळ्यात सुरु असले तरी मोठी दरवाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याने ग्राहकांना 20 टक्के परतावा दिला आहे. सोने-चांदी नवीन रेकॉर्ड करु शकतात. जागतिक मंचावर दोन युद्ध सुरु आहे आणि सणासुदीमुळे सोने-चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today : वाढता वाढता वाढे, सोने-चांदी मोडणार रेकॉर्ड, जाणून घ्या ताजा भाव
Image Credit source: वेडिंगवायर्स
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : सोने-चांदी या दिवाळीपूर्वी धमाका करण्याची शक्यता आहे. गेल्या सात महिन्यातील दरवाढीचा विक्रम मौल्यवान धातूंनी इतिहासजमा केला आहे. शुक्रवारी सकाळी आशियातील व्यापारी सत्रात सोने-चांदीने पुन्हा कमबॅक केले आहे. त्यामुळे दरवाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोन्याची किंमती जागतिक बाजारात जवळपास 1,985 डॉलरवर व्यापर करत आहे. भावात 0.05 टक्क्यांची उसळी आली आहे. डॉलर मजबूत स्थितीत आहे. तर अमेरिकन तिजोरीला फटका बसला आहे. जागतिक पटलावर दोन युद्धाने सोने-चांदीत (Gold Silver Price Today 27 October 2023) तेजी येण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर कदाचित भावात वाढ होऊ शकतो.

4 हजारांपेक्षा अधिक वाढ

या महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,750 रुपये होता. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,530 रुपये होती. तर 26 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,950 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 62,110 रुपये आहे. या काळात सोन्यात 4,580 रुपयांची वाढ दिसून आली. 3 ऑक्टोबर रोजी एक किलो चांदी 71,000 रुपये होती. तर 26 ऑक्टोबर रोजी एक किलो चांदीचा भाव 75,100 रुपये होता. चांदीत 4100 रुपयांची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

या आठवड्यात वधारले भाव

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्यात 500 रुपयांची दरवाढ झाली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या. 24 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत 240 रुपयांची वाढ झाली. 25 ऑक्टोबर रोजी 110 तर 26 ऑक्टोबर रोजी सोन्यात 160 रुपयांची वाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

चांदीमध्ये चढउताराचे सत्र

या आठवड्यात 23 ऑक्टोबर रोजी किंमतीत 200 रुपयांची घसरण आली. 24 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 26 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,984 रुपये होते. 23 कॅरेट 60,740 रुपये, 22 कॅरेट सोने 55,861रुपये, 18 कॅरेट 45,738 रुपये, 14 कॅरेट सोने 35,676 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71560 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.