Gold Silver Rate Today 28 July 2024 : मोठ्या ब्रेकनंतर सुवर्ण भरारी; चांदी अजूनही सुस्तावलेली, 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती

Gold Silver Rate Today 28 July 2024 : गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 23 जुलै रोजी बजेटमध्ये मौल्यवान धातूवरील सीमा शुल्कात कपात झाली. परिणामी दोन्ही धातूत विक्रमी घसरण झाली. आता सोन्याने इतकी उसळी घेतली आहे.

Gold Silver Rate Today 28 July 2024 : मोठ्या ब्रेकनंतर सुवर्ण भरारी; चांदी अजूनही सुस्तावलेली, 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 8:30 AM

गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीची पिछेहाट सुरु होती. 23 जुलै रोजी बजेटमध्ये मौल्यवान धातूवरील सीमा शुल्कात कपातीचा निर्णय झाला. सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर येऊन ठेपले. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. गेल्या 15 दिवसांत चांदी 7 हजारांनी तर सोने 2500 रुपयांहून अधिकने उतरले. सीमा शुल्क कपातीचा हा परिणाम होता. आता सोन्याने मरगळ झटकली आहे. सोन्यात दरवाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत अजूनही वाढ झालेली नाही. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 28 July 2024 )

सोन्याने मरगळ झटकली

गेल्या दहा दिवसांपासून सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे. 18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 18 जुलै 74,990 रुपये होता. तो 26 जुलै रोजी 68,880 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम म्हणजे सोने 6,110 रुपयांनी स्वस्त झाले. तर या आठवड्यात सोने 600 रुपयांनी उतरले होते. 27 जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत 270 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा भाव स्थिर

चांदीत गेल्या दोन आठवड्यापासून घसरणीचे सत्र सुरु आहे. 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी स्वस्त झाली. 24 जुलै रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 25 जुलै रोजी 3,000 रुपयांनी किंमत उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,131, 23 कॅरेट 67,858, 22 कॅरेट सोने 62,408 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,098 रुपये, 14 कॅरेट सोने 39,857 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,271 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा.
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......