Gold Silver Rate Today 28 May 2024 : सोने-चांदीची दरवाढीची सलामी; सराफा बाजारात पुन्हा वाढल्या किंमती, असा आहे भाव

Gold Silver Rate Today 28 May 2024 : या आठवड्याची सुरुवाती दरवाढीने झाले. सोने आणि चांदीने भाववाढीची सलामी दिली. गेल्या आठवड्यात सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीत 6 हजारांची पडझड झाली होती. आता आशा आहेत सराफा बाजारात किंमती...

Gold Silver Rate Today 28 May 2024 : सोने-चांदीची दरवाढीची सलामी; सराफा बाजारात पुन्हा वाढल्या किंमती, असा आहे भाव
सोन्याची मोठी भरारी
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 8:28 AM

सोने आणि चांदीने दरवाढीची सलामी दिली. आठवड्याची सुरुवात मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढीने झाली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतींनी उसळी घेतली होती. सोने 75 हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेले. तर चांदीने 96 हजारांचा टप्पा गाठला होता. या आठवड्यात बेशकिंमती धातू कोणता पल्ला गाठतात की पुन्हा मोठी घसरण होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आता सकाळच्या सत्रात अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 28 May 2024 )

सोने 270 रुपयांनी महागले

गेल्या आठवड्यात सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. दोन दिवसानंतर त्यात पडझडीचे सत्र सुरु झाले. सोने 2700 रुपयांनी घसरले. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आठवड्याच्या अखेरीस भाव स्थिर होते. 27 मे रोजी सोन्यात 270 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 1500 रुपयांनी महागली

चांदीत गेल्या आठवड्यात 6 हजारांची स्वस्ताई आली. त्यापूर्वी चांदीने 12,000 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या पाठोपाठ चांदीने पण भरारी घेतली. 27 मे रोजी चांदी 1500 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,191 रुपये, 23 कॅरेट 71,902 रुपये, 22 कॅरेट सोने 66,127 रुपये झाले. 18 कॅरेट 54,143 रुपये, 14 कॅरेट सोने 42,232 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,811 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.