Gold Silver Rate Today 29 September 2024 : स्वस्त झाले का सोने? तेजीला लागला का ब्रेक, चांदीने घेतली भरारी की, झाले फेल, जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Rate Today 29 September 2024 : सोने आणि चांदीने गेल्या दोन आठवड्यात उच्चांक गाठला. या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतर दोन्ही धातूत मोठी घसरण झाली होती. या दोन आठवड्यात ही वसूली पूर्ण झाली. आता काय ाहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

Gold Silver Rate Today 29 September 2024 : स्वस्त झाले का सोने? तेजीला लागला का ब्रेक, चांदीने घेतली भरारी की, झाले फेल, जाणून घ्या आजचे भाव
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 8:29 AM

जगात दोन युद्ध सुरू आहेत. त्यात अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू आहेत. तर जागतिक बाजारावर अमेरिकन धोरणाचा परिणाम दिसून आला. सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतली. भारतीय सराफा बाजारात ही मौल्यवान धातुत वाढ दिसली. गेल्या दोन आठवड्यात किंमतीत वाढ झाली. या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात चढउताराचे सत्र दिसले. आता पितृपक्ष लवकरच संपणार आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होईल. येत्या महिन्यात दसरा, दिवाळी हे सण येत आहे. त्यामुळे किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता अशा आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 28 September 2024 )

सोन्याची 1500 रुपयांची भरारी

या आठवड्यात सोने 1500 रुपयांहून अधिकची वाढ झाली. 23 सप्टेंबर रोजी दर 220 रुपये, 24 सप्टेंबर रोजी 210 रुपये तर 25 सप्टेंबरला 660 रुपयांनी भाव वधारला. 26 सप्टेंबर रोजी किंमतीत बदल झाला नाही. 27 सप्टेंबरला सोने 430 रुपयांनी महागले. 28 तारखेला भाव जैसे थे होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची 3 हजारांची घोडदौड

गेल्या दोन आठवड्यात चांदीने 6,000 रुपयांची मुसंडी मारली होती. या आठवड्यात चांदी 3 हजार रुपयांनी वधारली. 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 25 सप्टेंबर रोजी किंमती 2,000 रुपयांनी वधारल्या. 27 सप्टेंबरला त्यात 1 हजार रुपयांची भर पडली. काल भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,640, 23 कॅरेट 74,337, 22 कॅरेट सोने 69,286 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,730 रुपये, 14 कॅरेट सोने 44,249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,448 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.