Gold Silver Rate Today 3 December 2024 : सोने-चांदी उतरले की भाई, खरेदीची करा तयारी, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 3 December 2024 : सोने आणि चांदीत या पुन्हा स्वस्ताई आली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही मौल्यवान धातुत मोठी घसरण झाली. नंतर दरवाढ झाली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा मिळाला. बेशकिंमतीत धातुत मोठी घसरण झाली. अशा आहेत आता किंमती

Gold Silver Rate Today 3 December 2024 : सोने-चांदी उतरले की भाई, खरेदीची करा तयारी, अशा आहेत किंमती
सोने आणि चांदी किंमत
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 8:33 AM

लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. भावातील चढउताराचा ग्राहकांवर परिणाम होत आहे. एक दिवसापूर्वी स्वस्तात खरेदी केलेले सोने, दुसर्‍याच दिवशी गगनाला भिडल्याने त्यांचा खिसा कापल्या जात आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत मोठी घसरण दिसली. त्यानंतर किंमतींनी उसळी घेतली. तर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातुत मोठी घसरण झाली. सोने आणि चांदीच्या किंमती उतरल्या. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक लवकरच होईल. त्यात व्याजदर कपात होते की वाढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व धोरणांचा सोने आणि चांदीवर सुद्धा परिणाम दिसून येईल. आता बेशकिंमती धातुचा असा आहे भाव... (Gold Silver Price Today 3 December 2024 )

सोन्यात आली स्वस्ताई

गेल्या आठवड्यात सोने एक हजार रुपयांनी वधारले. तर जवळपास 500 रुपयांनी उतरले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सोन्याच्या किंमतीत 650 रुपयांची घसरण झाली. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव उतरला. 2 डिसेंबर रोजी सोने अनुक्रमे 600 आणि 650 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची किंमत उतरली

गेल्या 15 दिवसांत चांदीने मोठी उसळी घेतली. पण तितकीच किंमतीत घसरण झाली. गेल्या आठवड्यात चांदीत 2500 रुपयांची घसरण झाली. तर आठवड्याच्या अखेरीस त्यात 2 हजारांची महागाई आली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 500 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,308, 23 कॅरेट 76,002, 22 कॅरेट सोने 69,898 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,231 रुपये, 14 कॅरेट सोने 44,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,6111 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.