Gold Silver Rate Today : रक्षा बंधनाला सोने-चांदी उजळले, भावात मोठी उसळी
Gold Silver Rate Today : सणासुदीच्या काळात सोने-चांदीने पुन्हा गिअर बदलला आहे. अजून टॉपचा गिअर टाकलेला नाही. पण दोन्ही धातूंनी आज उसळी घेतली. ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही धातू दबाव झुगारण्याच्या तयारीत आहे. पण जागतिक तज्ज्ञांनी हा एक ट्रेंड असल्याचे संकेत दिले आहे. अजूनही जागतिक बाजारात गुंतवणूकदार सोन्यात संभाळून गुंतवणूक करत आहेत.
नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात पण सोने-चांदीने आगेकूच केली. अमेरिकेत, रोजगाराच्या आकड्यांनी दिलासा दिला आहे. बेरोजगारी कमी होत असल्याचे संकेत मिळाल्याने सोने-चांदीला पण भरते आले आहे. जागतिक बाजारातील वरिष्ठ तज्ज्ञ Alex Kuptsikevich, यांच्या मते गेल्या 50 दिवसांतील सरासरी किंमतीकडे सोन्याची वाटचाल सुरु आहे. पण लागलीच सोन्यात गुंतवणुकीचा सल्ला देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा एक ट्रेंड असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारात अनुकूलता नसल्याने गुंतवणूकदार संस्था सोन्याकडे अजूनही पूर्णपणे वळल्या नाहीत. भारतीय बाजारात पण सोन्यासह चांदीने (Gold-Silver Price Today 30 August 2023) चांगलीच उसळी घेतली. ऑगस्ट महिन्यात मोठा ब्रेक घेतल्यानंतर अखेरच्या टप्प्यात सोने-चांदीने दरवाढीचा झेंडा फडकावला आहे. पुढील महिन्यात सोने-चांदीची वाटचाल काय असेल, याचा आताच अंदाज बांधणे अवघड आहे.
शेवटच्या सत्रात जोरदार बॅटिंग
गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याने तडाखेबंद खेळी केली आहे. महिन्याच्या सुरुवातीला 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर ब्रेक घेतला. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 28 ऑगस्ट रोजी सोन्यात 50 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेट सोने 54,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.
चांदीची उसळी
- 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली.
- 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या.
- 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला.
- 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली.
- 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या.
- 24 ऑगस्ट रोजी चांदीने 1600 रुपयांची मोठी झेप घेतली.
- 26 ऑगस्ट रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या.
- 29 ऑगस्ट रोजी चांदीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली.
- गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,869 रुपये, 23 कॅरेट 58,633 रुपये, 22 कॅरेट सोने 53,924 रुपये, 18 कॅरेट 44152 रुपये, 14 कॅरेट सोने 34,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,781रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते.