Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे रेकॉर्डवर रेकॉर्ड, एकाच दिवसात विक्रमी झेप
Gold Silver Rate Today : सोने-चांदीने 4 मे 2023 रोजीचा रेकॉर्डच इतिहासजमा केला नाही, तर नवीन रेकॉर्ड पण केला आहे. दोन्ही धातूंनी उंच झेप घेतली आहे. या नवीन उच्चांकामुळे ग्राहकांचे मात्र डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. सोने आता 63 हजारांच्या दिशेने तर चांदी 77 हजारांच्या दिशेने आगेकूच करत आहे.
नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्याने मुसंडी मारली. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी होती. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये असे होते. हा रेकॉर्ड मोडीत निघाला. सोन्याने जवळपास 300 रुपयांची झेप घेतली. चांदी 75,000 रुपयांच्या घरात पोहचली. पण बुधवारी मौल्यवान धातूंनी पुन्हा जोरदार उसळी घेतली. सोने-चांदीने (Gold Silver Price Today 30 November 2023)पुन्हा नवीन विक्रम नावावर कोरला. या सर्व घडामोडींमुळे ऐन लग्नसराईत वर आणि वधूकडील मंडळी चिंतेत पडली आहे. सोन्याने विक्रमी धाव घेतल्याने लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे.
सोने-चांदीची जोरदार मुसंडी
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये अशी होती. आता सोन्याचा भाव 62,629 रुपयांवर पोहचला आहे. चांदी पण चमकली आहे. एक किलो चांदीसाठी 75,700 रुपये मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, चांदी अजून जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे.
गुडरिटर्न्सनुसार, 63,530 रुपये किंमत
दिवाळीपासून सोन्यात मोठी दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची गगन भरारी
गेल्या दोन आठवड्यात चांदीने गगन भरारी घेतली. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,629 रुपये, 23 कॅरेट 62,378 रुपये, 22 कॅरेट सोने 57,368 रुपये झाले. 18 कॅरेट 46,972 रुपये, 14 कॅरेट सोने 36,638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.