Gold Silver Rate Today 4 June 2024 : ऐतिहासिक निकालापूर्वीच दणकावून आपटली चांदी, सोने इतके झाले स्वस्त

Gold Silver Rate Today 4 June 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल आता लागलीच हाती येतील. पण त्यापूर्वीच सोने आणि चांदीत मोठी दणआपट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पण मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता.

Gold Silver Rate Today 4 June 2024 : ऐतिहासिक निकालापूर्वीच दणकावून आपटली चांदी, सोने इतके झाले स्वस्त
सोने आणि चांदी झाली स्वस्त
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 7:43 AM

लोकसभा निवडणूक 2024 कोण जिंकणार, जनतेचा कौल कुणाला हे अवघ्या काही तासात समोर येईल. पण व्यापारी जगतातून एक मोठी खबरबात समोर येत आहे. सोने आणि चांदीत गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरु असलेली घसरण अजूनही थांबलेली नाही. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त झाले. तर चांदीचा तोरा उतरला. चांदी दणकावून आपटली. चांदी या पाच दिवसांत 5 हजार रुपयांनी आपटली आहे. तर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मौल्यवान धातूच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 4 June 2024 )

सोन्याने दिली आनंदवार्ता

गेल्या गुरुवारपासून सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे. 30 मे रोजी 440 रुपयांची तर 1 जून रोजी त्यात 210 रुपयांची घसरण झाली. 31 मे रोजी भाव स्थिर होता. त्यापूर्वी सोन्यामध्ये 750 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जून रोजी सोने 210 रुपयांनी स्वस्त झाले. तर 3 मे रोजी किंमती 440 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी दणकावून आपटली

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 6 हजारांची भरारी घेतली होती. त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. गेल्या पाच दिवसांत चांदीत 5 हजारांची घसरण झाली. 30 मे रोजी चांदी 1200 रुपये, 31 मे रोजी 1000 रुपये, 1 जून रोजी 2,000 रुपये तर 3 जून रोजी 700 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,776 रुपये, 23 कॅरेट 71,489 रुपये, 22 कॅरेट सोने 65,747 रुपये झाले. 18 कॅरेट 53,832 रुपये, 14 कॅरेट सोने 41,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,217 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.