नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीत सध्या चढउताराचे सत्र सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. ऑक्टोबरच्या शेवटी दोन्ही धातूत घसरण झाली. अमेरिकन केंद्रीय बँकेचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाय योजनांचा धोशा लावला आहे. पण यावेळी फेड व्याजदर वाढवणार नाही, असा काही अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. तसे झाल्यास सोने-चांदीत मोठी उसळी टळेल. सध्या इस्त्राईल-हमासच्या युद्ध लांबल्यास दोन्ही धातूच्या किंमतीवर परिणाम होईल. मागील तीन दिवसांत सोने-चांदीत (Gold Silver Price Today 4 November 2023) घसरण झाली. गुरुवारी भाव किंचित वाढले. आता पुन्हा किंमती कमी झाल्या आहेत.
काय आहे सोन्याचा भाव
ऑक्टोबरचे शेवटचे दोन दिवस आणि नोव्हेंबर महिन्याची सुरुवातीला सोने 1020 रुपयांनी स्वस्त झाले.
30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 230 रुपये, 550 रुपये आणि 320 रुपयांनी किंमती घसरल्या. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. त्यात पुन्हा घसरण आली. आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी झाली स्वस्त
गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची तर 1 नोव्हेंबर रोजी 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि तेवढीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,075 रुपये, 23 कॅरेट 60,830 रुपये, 22 कॅरेट सोने 55,945 रुपये झाले. 18 कॅरेट 45,806 रुपये, 14 कॅरेट सोने 35,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 71,771 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.