Gold Silver Rate Today 4 October 2024 : सोन्याचा दांडिया रास, चांदीने गवसेना सूर, नवरात्रोत्सवात किंमतीचा कोणता रंग?
Gold Silver Rate Today 4 October 2024 : शेअर बाजारात भूकंप आला असला तरी सराफा बाजारात सोन्याचा गरबा सुरू आहे. गेल्या दोन दिवसात सोने 600 रुपयांनी वधारले आहे. तर चांदीला अजून दांडिया रासच्या तालावर थिरकता आलेले नाही. काय आहेत सणासुदीत किंमती?
मध्य-पूर्वेत युद्धाचा ज्वर चढला आहे. रशिया-यु्क्रेन युद्धासोबतच इराण, लेबनॉन, हमास विरोधात इस्त्रायल असा सामना रंगल्याने कच्चा तेल्याच्या किंमतीला उकळी फुटली आहे. या घडामोडींमुळे जगभरातील शेअर बाजार भयभीत झाले आहे. काल भारतीय शेअर बाजाराने सपशेल लोटांगण घातले. तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बड्या गुंतवणूकदारांचा ओढा वाढला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सोन्याने 600 रुपयांहून अधिकची उसळी घेतली. पण चांदीला आठवडाभरापासून सूर काही गवसलेला नाही. चांदीत सोन्याइतकी मोठी उलथापालथ दिसली नाही. आता काय आहेत मौल्यवान धातुच्या किंमती? Gold Silver Price Today 4 October 2024 )
सोन्याची दोन दिवसांत उसळी
मागील आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी तर 1 ऑगस्ट रोजी 330 रुपयांनी सोने घसरले होते. 2 ऑक्टोबर रोजी त्यात 540 रुपयांची वाढ झाली. 3 ऑक्टोबर रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा सूर हरवला
गुडरिटर्न्सवरील आकडेवारीनुसार चांदीला सूर गवसला नाही. 29 सप्टेंबरपासून चांदीची विश्रांती सुरु आहे. किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. चांदीचे भाव अद्याप अपडेट झालेले नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,615, 23 कॅरेट 75,312, 22 कॅरेट सोने 69,263 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,711 रुपये, 14 कॅरेट सोने 44,235 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,671 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.