Gold Silver Rate Today 5 April 2024 : ग्राहकांनी सराफा बाजारात यावे की नाही? सोने-चांदीने फुंकली दरवाढीची तुतारी, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड

| Updated on: Apr 05, 2024 | 8:35 AM

Gold Silver Rate Today 5 April 2024 : एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने दरवाढीचा बिगूल वाजवला. आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तुटले. सोन्याने तुफान घौडदौड केली तर चांदीने पण मुलखगिरी केली. त्यामुळे सराफा बाजारात यावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला. काय आहे आता भाव?

Gold Silver Rate Today 5 April 2024 : ग्राहकांनी सराफा बाजारात यावे की नाही? सोने-चांदीने फुंकली दरवाढीची तुतारी, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड
सोने-चांदीची जोरदार मुसंडी
Follow us on

एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने दरवाढीची तुतारी फुंकली. भाववाढीचा कहर झाला आहे. अवघ्या चार दिवसांत सोने आणि चांदीने गेल्या चार महिन्यातील सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. सोने या चार दिवसांत 2300 रुपयांनी तर चांदीने 4,000 रुपयांचा टप्पा गाठला. देशातील सुवर्णपेठ जळगावमध्ये जीएसटीसह सोने 72,000 रुपयांच्या घरात पोहचले. देशातील मोठ्या मोठ्या सराफा पेठेत जवळपास असाच भाव आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला आहे. मौल्यवान धातूंनी दरवाढीचा गिअर टाकल्याने सराफा बाजारात यावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. सोने आणि चांदीतील दरवाढीची अशी आहे अपडेट (Gold Silver Price Today 5 April 2024)

  1. चार दिवसांत 2300 रुपयांची वाढ मार्च महिन्यानंतर सोन्याने एप्रिलच्या चारच दिवसांत दरवाढीची तुतारी फुंकली. मार्च महिन्याच्या शेवटच्या सत्रात मौल्यवान धातूत 2000 रुपयांची उसळी आली होती. या 1 एप्रिल रोजी सोन्याने 930 रुपयांची भरारी घेतली. 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची घसरण झाली. 3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी उसळले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी दर वाढले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीचा चौकार – मार्च अखेरीस चांदी 1100 रुपयांनी महागली होती. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांदीने टॉप गिअर टाकला. 1 एप्रिलला 600 रुपयांनी चांदी महागली. 2 एप्रिलला त्यात 400 रुपयांची भर पडली. 3 एप्रिलला बेशकिंमती धातूने 2 हजारांची जोरदार मुसंडी मारली. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती उसळल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 82,000 रुपये मोजावे लागणार आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 69,364 रुपये, 23 कॅरेट 69,086 रुपये, 22 कॅरेट सोने 63,537 रुपये झाले.18 कॅरेट 52,023 रुपये, 14 कॅरेट सोने 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 77,594 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हे सुद्धा वाचा