Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today: हसरी सकाळ! सोने-चांदीची आनंदवार्ता

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीने सकाळीच आनंदवार्ता आणली. गेल्या तीन दिवसांपासून भावात घसरण होत आहे. त्यामुळे सराफा बाजारात गर्दी उसळली आहे. जुलै महिन्याने खरेदीदारांच्या आनंदावर विरजण ओतले होते. या महिन्यात किंमती पुन्हा घसरणीवर आहेत.

Gold Silver Rate Today: हसरी सकाळ! सोने-चांदीची आनंदवार्ता
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : सोन्या-चांदीने (Gold Silver Price Today) सकाळीच आनंदवार्ता आणली. गेल्या तीन दिवसांपासून भावात घसरण होत आहे. त्यामुळे सराफा बाजारात गर्दी उसळली आहे. जुलै महिन्याने खरेदीदारांच्या आनंदावर विरजण ओतले होते. या महिन्यात किंमती पुन्हा घसरणीवर आहेत. ऑगस्टच्या पहिल्या तारखेला दोन्ही धातूत दरवाढ झाली होती. पण त्यानंतर घसरणीचे सत्र सुरु आहे. या आठवड्यात सोने-चांदीत घसरण झाल्याने सर्वांना हायसे वाटले आहे. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीने खरेदीदारांना, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून आला. गेल्या तीन दिवसांत सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली.

चार प्रमुख शहरातील भाव काय

देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये, तर 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,110 रुपये, तर 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम, तामिळनाडूची राजधानी चेन्नईत 24 कॅरेट सोने 58,120 रुपये, तर 22 कॅरेट सोने 55,350 रुपये आहे. कोलकत्त्यात 22 कॅरेट सोने 55,350 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्यात आपटी बार

जुलै महिन्यात सोने-चांदीचा भाव वधारला होता. शेवटच्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात घसरण दिसून आली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली. तर 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 4 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत 3,000 रुपयांची घसरण

जुलै महिन्यात चांदी घसरली. ऑगस्ट महिन्यात चांदीने पहिल्याच दिवशी एक हजारांची उसळी घेतली. दुसऱ्या दिवशी भावात 700 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी चांदीत आपटी बार झाला. किंमती 2300 रुपयांनी घसरल्या. 4 ऑगस्ट रोजी पुन्हा 200 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. गेल्या तीन दिवसांतील घसरणीमुळे एक किलो चांदी 74,800 रुपयांवर आली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,294 रुपये, 23 कॅरेट 59,057 रुपये, 22 कॅरेट सोने 54,313 रुपये, 18 कॅरेट 44,471 रुपये, 14 कॅरेट सोने 34,687 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,000 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.