Gold Silver Rate Today : सोने-चांदीची तुफान बॅटिंग, भावांची 65,000 हजारांकडे आगेकूच

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची तुफान घौडदौड सुरु आहे. आता मौल्यवान धातू 65,000 रुपयांवर झेप घेण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही दरवाढ सर्वसामान्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भारतीयांचं सुवर्णप्रेम एवढ्यात थांबण्याची शक्यता नाही. शहरी भागातील काही ग्राहक आता प्लॅटिनमकडे वळले आहेत.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची तुफान बॅटिंग, भावांची 65,000 हजारांकडे आगेकूच
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 8:41 AM

नवी दिल्ली | 5 डिसेंबर 2023 : सोने-चांदीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात सोने-चांदीची तुफान घौडदौड सुरु आहे. दिवाळीदरम्यान सोने-चांदी वधारले होते. किंमतींमधील वाढीला मोठा ब्रेक लागलेला नाही. उलट किंमती सातत्याने वाढत आहे. या दोन आठवड्यात किंमतींनी सलग दरवाढीची सलामी ठोकली आहे. सोने लवकरच 65,000 रुपयांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चांदी पण मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडच पाणी पळाले आहे. शहरी भागात काही ग्राहकांनी सोन्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. प्लॅटिनमच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. काय आहे सोने-चांदीचा भाव? (Gold Silver Price Today 5 December 2023)

सोन्याला दरवाढीची चटक

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) यावर्षी 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये असा होता. हा सर्वोच्च भाव होता. 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर रोजी नवनवीन रेकॉर्ड झाले. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,728 रुपये झाला. आता हे रेकॉर्ड पण इतिहासजमा झाले. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्यात मोठी उसळी

या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 1030 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 1300 रुपयांची वाढ

चांदीत या डिसेंबर महिन्याच्या चार दिवसांत 1300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी चमकली होती. चांदीत दरवाढीचे सत्र सुरुच आहे. दिवाळीपूर्वी पण चांदीने मोठी उसळी घेतली होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 80,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,281 रुपये, 23 कॅरेट 63,028 रुपये, 22 कॅरेट सोने 57,965 रुपये झाले. 18 कॅरेट 47,461 रुपये, 14 कॅरेट सोने 37,019 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 76,430 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.