Gold Silver Rate Today 5 December 2024 : उसळीनंतर सोन्यात घसरण, 10 ग्रॅमची काय आहे किंमत? चांदी आज पण सुस्तावली

Gold Silver Rate Today 5 December 2024 : सोन्यात उसळीनंतर पुन्हा स्वस्ताई आली आहे. तर चांदी अजूनही सुस्तावलेली आहे. चांदीत जितकी वाढ झाली, तितकीच घसरण झाली. त्यानंतर किंमतीत मोठा बदल झाला नाही. या आठवड्यात दोन्ही धातुत चढउताराचे सत्र दिसले. आता अशा आहेत मौल्यवान धातुच्या किंमती

Gold Silver Rate Today 5 December 2024 : उसळीनंतर सोन्यात घसरण, 10 ग्रॅमची काय आहे किंमत? चांदी आज पण सुस्तावली
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 9:10 AM

राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. सर्व मळभ हटले. पण सोने आणि चांदीच्या किंमतींबाबतचा सस्पेन्स दूर झालेला नाही. दोन्ही धातु किंमतीबाबत धरसोड करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धातुत चढउताराचे सत्र आहे. दोन्ही धातुंना अजून एकतर्फी चाल चालता आलेली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत पडझड झाली. त्यानंतर त्यात उसळी आली. चांदीला 30 नोव्हेंबरपासून सूर गवसला नाही. सोन्याने मंगळवारी उसळी घेतल्यानंतर काल किंमती स्थिरावल्या. तर आज सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. आता अशा आहेत या मौल्यवान धातुच्या किंमती(Gold Silver Price Today 5 December 2024 )

सोन्यात चढउतार

मागील आठवड्यात सोने हजार रुपयांनी वधारले. तर 500 रुपयांनी घसरले. या सोमवारी सोन्याच्या किंमतीत 650 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने 430 रुपयांनी वधारले. काल सोन्याच्या भावात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीला सूर गवसेना

गेल्या 15 दिवसांत चांदीने मोठी उसळी घेतली होती. पण तितकीच किंमतीत घसरणही झाली. मागील आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी उतरली. या आठवड्यात सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. तर दोन दिवसांपासून चांदी सुस्तावली आहे. किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,392, 23 कॅरेट 76,086, 22 कॅरेट सोने 69,975 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,294 रुपये, 14 कॅरेट सोने 44,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,025 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.