Gold Silver Rate Today 5 June 2024 : लोकसभा निकालात धक्कातंत्र; सोने-चांदीने पण दिला ग्राहकांना असा ‘चकवा’; असा वधारला भाव
Gold Silver Rate Today 5 June 2024 : लोकसभा निकालात धक्कातंत्र दिसले. अनेकांना मोठा फटका बसला. निकालापूर्वी मौल्यवान धातूत घसरण झाली होती. निकालानंतर ग्राहकांना पण सोने आणि चांदीने असाच अनपेक्षित धक्का दिला.
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल अनेकांना अनपेक्षित होता. इंडिया आघाडीचा सफाया होण्याचा दावा करण्यात येत होता. पण जनतेच्या न्यायालयात वेगळा निकाल लागला. एक्झिट पोलचा नेहमीप्रमाणे पराभव झाला. निकालापूर्वी सोने-चांदीत मोठी घसरण झाली होती. निकालानंतर मौल्यवान धातूंनी पण धक्कातंत्राचा वापर केला. किंमतीत एकदम उसळी आली. बेशकिंमती धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 5 June 2024 )
घसरणीनंतर मोठी झेप
30 मेपासून सोन्याच्या दरवाढीला मोठा ब्रेक लागला. 30 मे रोजी 440 रुपये, 1 जूनला 210 रुपये, 3 जून रोजी 440 रुपयांची घसरण झाली. तर 4 जून रोजी सोन्याने 760 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 1200 रुपयांची वाढ
गेल्या पाच दिवसांत चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. 30 मे रोजी 1200 रुपये, 31 मे रोजी 1000 रुपये, 1 जून रोजी 2,000 रुपये तर 3 जून रोजी 700 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. तर 5 जून रोजी चांदीने 1200 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,969 रुपये, 23 कॅरेट 71,681 रुपये, 22 कॅरेट सोने 65,924 रुपये झाले. 18 कॅरेट 53,977 रुपये, 14 कॅरेट सोने 42,102 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,837 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता