Gold Silver Rate Today | मोठ्या उसळीनंतर चांदी दणकावून आपटली, मग सोन्याचा भाव काय? जाणून घ्या
Gold Silver Rate Today 5 March 2024 | चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, मार्चमध्ये सोने आणि चांदी करामत दाखवेल हा अंदाज अखेर खरा ठरला. बाजारातील बदलत्या घडामोडींचा हा परिणाम आहे. उंच भरारीनंतर चांदीत पडझड झाली तर सोन्याच्या किंमतीविषयी ग्राहकांच्या मनात उत्सुकता आहे, काय आहे मौल्यवान धातूचा भाव?
नवी दिल्ली | 5 March 2024 : चालू आर्थिक वर्षाचा हा अखेरचा महिना, मार्चमध्ये सोने आणि चांदीत कमाल उसळी येईल, असा अंदाज होता. तो अखेर खरा ठरला. गेल्या आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदीने उंच भरारी घेतली. दोन्ही धातूंनी हनुमान उडी घेतली. सोन्याने 800 रुपयांहून अधिकची रेकॉर्डब्रेक चढाई केली तर चांदी 1100 रुपयांनी महागली. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत पडझड झाली तर सोन्याने पण दरवाढीला रामराम ठोकला. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आता अशा आहेत सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 5 March 2024)…
टॉप गिअरनंतर सोन्यातील अपडेट काय
गेल्या आठवड्यात सोन्यात स्वस्ताई असताना, अखेरच्या सत्रात सोन्याने 800 रुपयांची चढाई केली. त्यामुळे आठवडा अखेर सराफा बाजारात ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले. 1 मार्च रोजी 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वधारल्या. पण गेल्या दोन दिवसांत किंमती स्थिर आहेत. त्यात कोणती पण वाढ झाली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
महागाईनंतर चांदीत आपटी बार
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि या महिन्याच्या सुरुवातीला चांदीत 15 दिवसांमध्ये 3400 रुपयांची घसरण झाली होती. पण 29 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 मार्च रोजी पण तितकीच वाढ झाली. 2 मार्च रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. 3 मार्चला किंमती 1400 रुपयांनी घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. 24 कॅरेट सोने 63,480 रुपये, 23 कॅरेट 63,226 रुपये, 22 कॅरेट सोने 58,148 रुपये झाले.18 कॅरेट 47,610 रुपये, 14 कॅरेट सोने 37,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,777 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.