Gold Silver Rate Today 5 October 2024 : नवरात्रोत्सवात दरवाढीचा रंग गडद; सोने-चांदीचा नवीन रेकॉर्ड, आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 5 October 2024 : नवरात्रोत्सवात सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. अजून काही दिवसांत दोन्ही मौल्यवान धातु सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवतील अशी स्थिती आहे. चांदी लवकरच 1 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. तर सोने सुद्धा 80 हजारांची धाव घेण्याचा अंदाज आहे.

Gold Silver Rate Today 5 October 2024 : नवरात्रोत्सवात दरवाढीचा रंग गडद; सोने-चांदीचा नवीन रेकॉर्ड, आता काय आहेत किंमती?
सोने चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 8:33 AM

मध्य-पूर्व देशात युद्धाला तोंड फुटले आहे. ही तिसऱ्या युद्धाची नांदी म्हटल्या जात असली तरी सर्वच देश त्यांच्या मतबलापूरता हा विषय हातळत असल्याचे समोर येत आहे. रशिया,चीनची आघाडी तर दुसरीकडे अमेरिका आणि दोस्त राष्ट्र मध्य-पूर्वेतील वातावरणात पडद्यामागून सूत्र हालवत आहेत. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून आला आहे. कच्चा तेलाचे भाव वाढले आहेत. शेअर बाजाराला फटका बसला आहे. तर सोने आणि चांदीच्या किंमती तापल्या आहेत. देशात उत्सवाचा उत्साह आहे. आता नवरात्रोत्सवात सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. अजून काही दिवसांत दोन्ही मौल्यवान धातु सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवतील अशी स्थिती आहे. चांदी लवकरच 1 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. तर सोने सुद्धा 80 हजारांची धाव घेण्याचा अंदाज आहे. अशा आहेत मौल्यवान धातुच्या किंमती? (Gold Silver Price Today 5 October 2024 )

सोन्याची दमदार कामगिरी

गेल्या आठवड्यात सोन्याने 1500 रुपयांचा टप्पा गाठला होता. या आठवड्यात आतापर्यंत सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली आहे. सुरुवातीला 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी तर 1 ऑगस्ट रोजी 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 2 ऑक्टोबर रोजी 540 रुपयांची दरवाढ झाली. 3 ऑक्टोबर रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. 4 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,360 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी चीरनिद्रेत

गुडरिटर्न्सवरील आकडेवारीनुसार चांदीत कोणताच बदल झालेला नाही. 29 सप्टेंबरपासून चांदीची विश्रांती सुरु आहे. किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. चांदीचे भाव अद्याप अपडेट झालेले नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात त्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,964, 23 कॅरेट 75,660, 22 कॅरेट सोने 69,583 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,973 रुपये, 14 कॅरेट सोने 44,439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,200 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.