Gold Silver Rate Today6 July 2024 : चांदीची तुफान बॅटिंग, सोन्याने घेतली माघार, आठवड्याच्या अखेरीस भाव काय

Gold Silver Rate Today 6 July 2024 : या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र होते. तर चांदीने गेल्या आठवड्यातील नरमाईची पूर्ण भरपाई केली. या आठवड्यात चांदीच्या किंमती झरझर वाढल्या. आता अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती

Gold Silver Rate Today6 July 2024 : चांदीची तुफान बॅटिंग, सोन्याने घेतली माघार, आठवड्याच्या अखेरीस भाव काय
सोने नरमले, चांदी सूसाट
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 8:29 AM

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीत मोठा उलटफेर दिसला. सोन्यात चढउताराचे सत्र होते. तर चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. दोन्ही धातूंचा भावफलक हालता राहिला. जून महिन्यातील नरमाईची कसर चांदीने जुलैच्या पहिल्या सत्रातच भरुन काढली. सोन्याने मरगळ झटकली. सोने दरवाढीवर स्वार झाले. तर चांदीने सलग पाच दिवस दमदार बॅटिंग केली. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 6 July 2024 )

सोन्यात चढउताराचे सत्र

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले. सुरुवातीला 2 जुलै 110 रुपयांनी सोने वधारले. दुसऱ्या दिवशी भावात बदल झाला नाही. 4 जुलै रोजी सोन्याने 710 रुपयांची उडी घेतली. तर शुक्रवारी भावात मोठा बदल दिसला नाही. आज सकाळी सोन्यात घसरणीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा भाव सूसाट

जून महिन्यात चांदीला कमाल दाखवता आली नाही. या महिन्याच्या सुरुवातीच्या सत्रात चांदीने मोठी मुसंडी मारली. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलैला 800 रुपयांनी, 3 जुलै रोजी भाव 500 रुपयांनी तर 4 जुलै रोजी चांदीने 1500 रुपयांची मुसंडी मारली. 5 जुलै रोजी त्यात 200 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 72,640 रुपये, 23 कॅरेट 72,349 रुपये, 22 कॅरेट सोने 66,538 रुपये झाले. 18 कॅरेट 54,480 रुपये, 14 कॅरेट सोने 42,494 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,709 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.