Gold Silver Rate Today | चांदीची जोरदार मुसंडी, सोन्याने घेतली भरारी, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
Gold Silver Rate Today 6 March 2024 | सोने आणि चांदीची दरवाढ होणार असा अंदाज यापूर्वी बांधला होता. तो खरा ठरला, तर आता सोने 70,000 रुपयांच्या घरात पोहचणार तर चांदीत ही मोठी उसळी येणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोने-चांदीचे भाव पाहिले असता, मौल्यावान धातूने मोठी भरारी घेतल्याचे दिसते. काय आहेत किंमती?
नवी दिल्ली | 6 March 2024 : सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा झटका दिला. गेल्या चार दिवसांत मौल्यवान धातूच्या किंमती वधारल्या. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये मौल्यवान धातूच्या किंमती वाढण्याचा अंदाज होता. तो खरा ठरला. आता सोने 70 हजारांच्या घरात जाणार असल्याचा अंदाज आहे. अर्थात लागलीच हा भाव गाठल्या जाणार नाही. त्यासाठी अजून काही दिवस बाकी आहे. चांदी पण लकाकणार आहे. सध्या सोने-चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आता अशा आहेत सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 6 March 2024)…
सोने एकदम सूसाट
सोन्याच्या स्वस्ताईचे दिवस जणू चारच दिवसांत गायब झाले. या महिन्यात 1 मार्चपासून ते 5 मार्चपर्यंत सोन्यात 2000 रुपयांची वाढ झाली. रेकॉर्डब्रेक किंमती वाढल्या. 1 मार्च रोजी 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वधारल्या. त्यानंतर किंमती स्थिर होत्या. त्यात कोणती पण वाढ झाली नाही. 5 मार्च रोजी किंमतीत 700 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आपटीनंतर उसळली चांदी
फेब्रुवारीच्या शेवटी आणि या महिन्याच्या सुरुवातीला चांदी 15 दिवसांमध्ये 3400 रुपयांनी स्वस्त झाली होती. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 2 मार्च रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. 3 मार्चला किंमती 1400 रुपयांनी घसरल्या. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. 24 कॅरेट सोने 64,598 रुपये, 23 कॅरेट 64,339 रुपये, 22 कॅरेट सोने 59,172 रुपये झाले.18 कॅरेट 48,449 रुपये, 14 कॅरेट सोने 37,790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,244 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.