Gold Silver Rate Today 7 April 2024 : सोन्यासह चांदीने केले ग्राहकांचे डोळे पांढरे; सहाच दिवसांत सर्व रेकॉर्ड गुंडाळले

Gold Silver Rate Today 7 April 2024 : सोने आणि चांदीने एप्रिल महिन्यात मोठा पल्ला गाठला. भूतो न भविष्यति अशा या दरवाढीने ग्राहकांचे डोळे मात्र पांढरे झाले. अनेकांनी या चार दिवसांत तर सराफा बाजारात जाऊन सुद्धा खरेदी टाळली. ताज्या आकड्यांनी तर ग्राहक अजून घामाघूम झाले. काय आहेत मौल्यवान धातूचे भाव?

Gold Silver Rate Today 7 April 2024 : सोन्यासह चांदीने केले ग्राहकांचे डोळे पांढरे; सहाच दिवसांत सर्व रेकॉर्ड गुंडाळले
सोने आणि चांदीचा कहर, ग्राहक दरवाढीच्या त्सुनामीने हैराणImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 8:40 AM

एप्रिल महिन्यातच सोने आणि चांदीने या वर्षातील सर्व रेकॉर्ड गुंडाळले. मौल्यवान धातूंच्या हनुमान उडीने ग्राहकांची तारंबळ उडाली. सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतीत दरवाढीची त्सुनामी आल्याने ग्राहकांना सराफा दुकानातील एसीतही घामाच्या धारा लागल्या. किडूकमिडूक करण्याचा मोह पण गृहलक्ष्मीला आवरता घ्यावा लागला. बेशकिंमती धातूंनी अवघ्या सहा दिवसांत ग्राहकांना दिवसाच तारे मोजावे लागले. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांत सोने 3600 रुपयांनी तर चांदी जवळपास 6,000 रुपयांनी वधारली. या जोरदार मुसंडीमुळे ग्राहकांनी सराफा बाजारातून काढता पाय घेतला. या महिन्यात सोन्यात दोनदा तर चांदीत एकदाच घसरण दिसून आली. यावरुन पुढील अंदाज ग्राहकांना घेता येऊ शकतो. अशा आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 7 April 2024)

सोने 3600 रुपयांनी महाग

एप्रिलच्या सुरुवातीला सहा दिवसांत सोन्याने मुसंडी मारली. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी वधारले, 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची भाव स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी 750 रुपयांनी किंमती वधारल्या. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांची दरवाढ दिसली. तर 5 एप्रिल रोजी 450 रुपयांची स्वस्ताई आली. 6 एप्रिल रोजी 1310 रुपयांची आघाडी उघडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी एकदम सूसाट

  1. एप्रिल महिन्यात चांदीने टॉप गिअर टाकला.
  2. सहा दिवसांत चांदी 5800 रुपयांनी महागली.
  3. 1 एप्रिलला 600 रुपये प्रति किलो चांदी महागली.
  4. 2 एप्रिल रोजी किलोमागे चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली.
  5. 3 एप्रिलला चांदीने 2 हजारांची हनुमान उडी घेतली.
  6. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी भाव वधारला.
  7. 5 एप्रिल रोजी किलोमागे 300 रुपयांची स्वस्ताई आली.
  8. 6 एप्रिल रोजी किलोमागे चांदी 1800 रुपयांनी उसळली.
  9. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 81,700 रुपयांपर्यंत खाली आला.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 69,882 रुपये, 23 कॅरेट 69,602 रुपये, 22 कॅरेट सोने 64,012 रुपये झाले.18 कॅरेट 52,412 रुपये, 14 कॅरेट सोने 40,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,096 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....