Gold Silver Rate Today | सोने महागले; चांदीत मोठी पडझड, अशी आहे किंमत

Gold Silver Rate Today 8 February 2024 | सोन्याने पडझडीनंतर अचानक उसळी घेतली. अर्थात भावात मोठी वाढ नसली तरी सोने वधारले आहे. तर चांदीने फेब्रुवारी महिन्यात ग्राहकांना दिलासा दिला. चांदी दोन हजार रुपयांनी घसरली आहे. या महिन्यात सोने-चांदीत चढउतार दिसून आला.

Gold Silver Rate Today | सोने महागले; चांदीत मोठी पडझड, अशी आहे किंमत
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 8:31 AM

नवी दिल्ली | 8 February 2024 : प्रेमाच्या आठवड्यात सोने तळपले आहे. सोन्यात वाढ झाली आहे. सोन्यात या आठवड्यात पडझड झाली. तर चांदीचा दर ही घसरला. फेब्रुवारी महिन्याचा विचार करता चांदीत 2 हजारांची घसरण झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात, जानेवारीत सोने-चांदीला नवीन उच्चांक गाठता आला नाही. किंमतीत चढउताराचे सत्र होते. जानेवारीमध्ये सोने 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी घसरले होते, तर महिन्याच्या शेवटी भाव वधारले होते. या महिन्याच्या सुरुवातीला मौल्यावान धातूंना कमाल करता आली नाही. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 8 February 2024)

सोने वधारले

फेब्रुवारीच्या सुरुवातील सोन्यात दरवाढ झाली. 1 फेब्रुवारीला सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारीला 220 रुपयांची घसरण झाली. 5 फेब्रुवारी रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 6 फेब्रुवारी रोजी भाव 220 रुपयांनी स्वस्त झाले. 7 फेब्रुवारी रोजी 180 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 2 हजारांची घसरण

जानेवारीत चांदी 4400 रुपयांनी घसरली होती. तर शेवटच्या आठवड्यात 2 हजारांनी महागली होती. चांदीत 2 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची वाढ झाली. 3 फेब्रुवारी रोजी 1,000 रुपयांनी भाव उतरले. 5 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमत उतरली तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी कमी झाल्या. 7 फेब्रुवारीला बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,646 रुपये, 23 कॅरेट 62,395 रुपये, 22 कॅरेट सोने 57,384 रुपये झाले. 18 कॅरेट 46,985 रुपये, 14 कॅरेट सोने 36,648 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,866 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.