Gold Silver Rate Today | महिला दिनी ग्राहकांचा हिरमोड, सोने सूसाट तर चांदी पण वधारली
Gold Silver Rate Today 8 March 2024 | सोन्याने मार्च महिन्यातील सात दिवसांत 2,720 रुपयांची उडी घेतली. तर या तीन दिवसांत 1,470 रुपयांची चढाई केली. सोन्याची सातत्याने घौडदौड सुरु आहे. तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. चांदी पण महागली आहे. ऐन लग्नसराईत वाढलेल्या दराने वधू-वराकडील मंडळींच्या जीवाला घोर लावला आहे.
नवी दिल्ली | 8 March 2024 : सोने-चांदीने मार्च महिन्यात जोरदार चढाई केली. सोन्याने आतपर्यंत 2,720 रुपयांचा लांब पल्ला गाठला तर चांदीने पण मजल दर मजल मोठा टप्पा गाठला. सोने आणि चांदीच्या या तुफान फटकेबाजीने ग्राहक भांबवले. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी आघाडी उघडल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली. भाव अजून वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोने 70,000 रुपयांच्या घरात पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अमेरिकन धोरण, जागतिक घडामोडींचा परिणाम यामुळे हे सर्व घडत आहे. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 8 March 2024)..
मार्चमध्ये सोन्याचा जलवा
या महिन्यात सोन्याचा जलवा आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याने मोठी उसळी घेतली. या सात दिवसांतील किंमतींवर नजर फिरवल्यास हे सहज लक्षात येते. या महिन्यात 1 मार्चपासून ते 7 मार्चपर्यंत सोन्याने 2720 रुपयांची चढाई केली. 1 मार्चला 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी 700 रुपयांची वाढ झाली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 500 रुपयांची वाढ
मार्च महिन्यात चांदीने जोरदार उसळी घेतली. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 2 मार्च 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी महागली. 6 मार्च रोजी 200 रुपयांची स्वस्ताई आली. 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 64,955 रुपये, 23 कॅरेट 64,695 रुपये, 22 कॅरेट सोने 59,499 रुपये झाले.18 कॅरेट 48,716रुपये, 14 कॅरेट सोने 37,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,265 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.