Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदी उतरले झरझर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच सत्रात दोनदा उसळी घेतल्यानंतर दोन्ही धातूमध्ये पडझड सुरु आहे. सोने-चांदीने दबाव झुगारुन उसळी घेतली होती. मात्र डॉलर मजबूत झाल्याने किंमती घसरल्या. चांदीत सर्वाधिक घसरण झाली आहे. दोन्ही धातू इतके स्वस्त झाले आहेत.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदी उतरले झरझर
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 9:23 AM

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : डॉलर सातत्याने मजबूतीकडे सरकत आहे. मध्यंतरी सोने-चांदीने दबाव झुगारुन ऑगस्ट शेवटच्या सत्रात बंडाळी केली. सोने-चांदीत वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातही दोन दिवस दरवाढीचे सत्र दिसून आले. पण नंतर या सात दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूमध्ये पडझड सुरु आहे. चांदीने तर अक्षरशः लोटांगण घेतले आहे. डॉलरची आगेकूच सुरुच राहिल्यास परदेशी गुंतवणूकदारांचा ओढा या धातूत कमी होईल. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडीत चीनची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत आहे. तर अमेरिका महागाईशी सामना करत आहे. युरोपियन देशात सध्या मंदीचे वारे आहे. त्याचा अनुकूल परिणाम डॉलरमध्ये दिसत आहे. तर प्रतिकूल परिणाम सोने-चांदीत दिसून येत आहे. सोने-चांदी (Gold Silver Rate Today 8 September 2023) या तीन दिवसांत इतके स्वस्त झाले आहे.

सोन्यात आपटी बार

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सत्रात सोने आपटले. दोन दिवस तेवढे सुगीचे होते. 1 सप्टेंबर सोने (Gold Rate Today) स्वस्त झाले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भाव जैसे थे होते. 4 सप्टेंबर भाव 100 रुपयांनी वधारले. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी किंमती घसरल्या. एकूण 300 रुपयांची घसरण झाली. 7 सप्टेंबर रोजी सोन्यात 160 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,040 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

हे सुद्धा वाचा

चांदी 3600 रुपयांनी स्वस्त

सप्टेंबर महिन्यात चांदी 3600 रुपयांनी स्वस्त झाली. ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात भाव (Silver Rate Today) वधारले. पण सप्टेंबर महिन्यात काहीच करिष्मा करता आला नाही. 1 सप्टेंबरला 500 रुपयांची, 2 सप्टेंबर रोजी 200, 4 सप्टेंबर रोजी 700, 5 सप्टेंबरला 1000 तर 6 सप्टेंबर रोजी 500 आणि 7 सप्टेंबर रोजी 700 रुपयांनी भाव घसरले. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,189 रुपये, 23 कॅरेट 58,952 रुपये, 22 कॅरेट सोने 54,217 रुपये, 18 कॅरेट 44392 रुपये, 14 कॅरेट सोने 34,626 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 71,170 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.