Gold Silver Rate Today | सोने पण घसरले, चांदीत पण पडझड, खरेदीदारांची बाजारात वर्दळ

Gold Silver Rate Today 9 February 2024 | या प्रेमाच्या आठवड्यात सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. भाव उतरल्याने तुमच्या आवडत्या व्यक्तीला या काळात महागडे गिफ्ट देऊ शकता. या आठवड्यात सोने-चांदीत घसरणीचे सत्र आहे. गेल्या आठवड्यात पण मौल्यवान धातूने दिलासा दिला होता.

Gold Silver Rate Today | सोने पण घसरले, चांदीत पण पडझड, खरेदीदारांची बाजारात वर्दळ
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 8:30 AM

नवी दिल्ली | 9 February 2024 : सोने आणि चांदीने या आठवड्यात दिलासा दिला. एक-दोन दिवस वगळता गेल्या आठवड्याप्रमाणेच पडझड झाली. सोने-चांदी स्वस्त झाल्याने ग्राहक आपोआप सराफा बाजाराकडे वळला. बाजारात भाऊगर्दी उसळली आहे. बजेटनंतर मौल्यवान धातूत वाढ होण्याचा अंदाज सध्या तरी फोल ठरला. जागतिक बाजारातील घाडमोडींमुळे सोने-चांदी स्वस्त झाले आहे. अमेरिकन फेडरल बँकेच्या पावलावर पाऊल टाकत आरबीआयने पण रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे बाजारात समीकरणे बदलली आहेत.आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 9 February 2024)

सोन्यात घसरण

या महिन्याच्या सुरुवातीला सोने वधारले. 1 फेब्रुवारीला सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले आणि 3 फेब्रुवारीला 220 रुपयांनी स्वस्त झाले. 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 7 फेब्रुवारी रोजी 180 रुपयांनी किंमती वधारल्या. 8 फेब्रुवारी रोजी किंमतीत किंचित घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत मोठी घसरण

जानेवारी महिन्यात चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर शेवटी 2 हजारांनी वधारली होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 3 फेब्रुवारी रोजी 1,000 रुपयांनी भाव उतरले. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी कमी झाल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने स्वस्त झाले तर चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,612 रुपये, 23 कॅरेट 62,361 रुपये, 22 कॅरेट सोने 57,353 रुपये झाले. 18 कॅरेट 46,959 रुपये, 14 कॅरेट सोने 36,628 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,950 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.