Gold Silver Rate Today 9 July 2024 : चांदीची मुलूखगिरी, तर सोन्याची दरवाढीच्या मैदानातून माघार, काय आहेत भाव

Gold Silver Rate Today 8 July 2024 : जून महिन्यातील मरगळ झटकून सोने आणि चांदीने जुलैच्या सुरुवातीला जोरदार मुसंडी मारली. मौल्यवान धातूंनी घौडदौड केली. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीची मुलूखगिरी सुरुच आहे. तर सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 9 July 2024 : चांदीची मुलूखगिरी, तर सोन्याची दरवाढीच्या मैदानातून माघार, काय आहेत भाव
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 8:33 AM

जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीसह सोन्याने दमदार सुरुवात केली. सुरुवातीला जबरदस्त बॅटिंग केली. या दोन्ही मौल्यवान धातूंनी जून महिन्यातील घसरणीची कसर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भरुन काढली. या आठवड्यातही चांदीची घौडदौड सुरुच आहे. गेल्या आठवड्यात चांदीने 5,000 रुपयांची मुसंडी मारली होती. तर सोन्याने 1500 रुपयांची आगेकूच केली होती. या आठवड्यात सोने नरमले. तर चांदी वधारली. अशा आहेत आता किंमती (Gold Silver Price Today 9 July 2024 )

वधारल्यानंतर सोन्यात नरमाई

गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. सोन्यात चढउताराचे सत्र दिसले. या आठवड्याची सुरुवात नरमाईने झाली आहे. जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी उन्हाळ्यात सोने खरेदीचा सपाटा लावल्याने भाव वधारले होते. आता सर्वच केंद्रीय बँकांनी आवक घटवल्याने सोन्याने नरमाईचा सूर आळवला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी घसरले. तर आज सकाळच्या सत्रात सोन्याने घसरणीचे संकेत दिले आहे. दुपारनंतर भावात बदल दिसू शकतो. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची दमदार आगेकूच

जून महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली होती. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात चांदीने 5,000 रुपयांची उसळी घेतली. आठवड्याच्या अखेरीस पण दमदार खेळी दाखवली. या आठवड्याच्या सुरुवातीला पण चांदीची चमक कायम आहे. सोमवारी, 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीची तुफान घौडदौड सुरु आहे. 24 कॅरेट सोने 72,746 रुपये, 23 कॅरेट 72,455 रुपये, 22 कॅरेट सोने 66,635 रुपये झाले. 18 कॅरेट 54,560 रुपये, 14 कॅरेट सोने 42,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 91,733 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.