Gold Silver Rate Today 9 November 2024 : दरवाढीच्या निवडणुकीत सोने-चांदीचे ट्रम्प कार्ड; किंमतीत पुन्हा उसळी

Gold Silver Rate Today 9 November 2024 : सोने चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्यात किंमती कमी जास्त झाल्या. सराफा बाजारात सध्या कभी खुशी कभी गम असे वातावरण आहे. दरवाढीच्या निवडणुकीत सोने आणि चांदीने पुन्हा ट्रम्प कार्ड खेळल्याने ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले.

Gold Silver Rate Today 9 November 2024 : दरवाढीच्या निवडणुकीत सोने-चांदीचे ट्रम्प कार्ड; किंमतीत पुन्हा उसळी
सोने चांदी किंमत
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 8:30 AM

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या विजयानंतर जगभरातील व्यापारी आणि व्यावसायिक धोरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या विजयाचा जागतिक बाजारात लागलीच परिणाम दिसून आला. या आठवड्यात सोने चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्यात किंमती कमी जास्त झाल्या. सराफा बाजारात सध्या कभी खुशी कभी गम असे वातावरण आहे. दरवाढीच्या निवडणुकीत सोने आणि चांदीने पुन्हा ट्रम्प कार्ड खेळल्याने ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले. आता सराफा बाजारात अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 9 November 2024 )

सोन्याची किंमतीत पुन्हा उसळी

या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसले. या मंगळवारी सोन्यात 150 रुपयांची स्वस्ताई आली. दुसऱ्या दिवशी भाव तितकाच वाढला. 7 नोव्हेंबर रोजी 180 रुपयांनी किंमती घसरल्या. तर 8 नोव्हेंबरला सोन्याने 900 रुपयांची मुसंडी मारली. आज सकाळच्या सत्रात सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

आपटी बार नंतर वधारली चांदी

या आठवड्यात चांदीने नरमाईचा सूर आळवला होता. 5 आणि 7 नोव्हेंबर रोजी चांदीत अनुक्रमे 1,000 आणि 3,000 रुपयांची मोठी घसरण झाली. तर 8 नोव्हेंबर रोजी चांदी एक हजार रुपयांनी वधारली. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,382 23 कॅरेट 77,072, 22 कॅरेट सोने 70,882 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,037 रुपये, 14 कॅरेट सोने 45,269रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,130 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.