Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा मूड काय? आज कितीची झाली घसरण

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने रिव्हर्स गिअर टाकल्याने सध्या सराफा बाजाराकडे ग्राहकांचे पाय वळले आहेत. गेल्या महिनाभरात भावात घसरण गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडली आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा मूड काय? आज कितीची झाली घसरण
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 9:10 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीत (Gold Silver Price) घसरणीचे सत्र सुरु आहे. ऐन लग्नसराईतील ही घडामोड ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. गुंतवणूकदारांनी सध्या स्वस्ताईचा हा योग साधला आहे. फेब्रुवारी, एप्रिल महिन्यात सोन्याने दरवाढीचा एक एक विक्रम नोंदवला होता. मे महिन्यात सोने नवीन विक्रम गाठेल असे वाटत असताना सोन्याची जोरदार घसरगुंडी उडाली. प्रति 10 ग्रॅम दोन हजार रुपयांपर्यंत भावात घसरण झाली. अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. चांदीच्या किंमतीत ही घसरण सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिनाच खरेदीदारांसाठी लक्की ठरला आहे.

आजचा भाव काय goodreturns च्या आकडेवारीनुसार, 30 मे रोजी, सोन्यात प्रति 10 ग्रॅम 100-120 रुपयांची घसरण झाली. मंगळवारी 22 कॅरेटचा भाव 55,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीत 400 रुपयांची घसरम होऊन भाव 72,600 रुपयांवर पोहचला. IBJA नुसार,मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,402 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,328 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 70,861 रुपये आहे.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,402 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,160 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,328 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,302 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

हे सुद्धा वाचा

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

देशात सोने होणार स्वस्त? सीईपीएनुसार, भारत 2023-24 मध्ये संयुक्त अरब अमिरातकडून 14 कोटी टन सोने अत्यंत माफत शुल्क देऊन आयात करणार आहे. प्रभावी सीमाशुल्क किंवा मोस्ट फेव्हर्ड नेशन दराच्या अनुषंगाने केवळ 1 टक्के सवलतीवर आयात होईल. सध्या त्यासाठी 15 टक्के शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे देशात सोने स्वस्त होण्याची अटकळ बांधण्यात येत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.