Gold Silver Rate Today : सोने चमकले, चांदी लकलकली! मकर संक्रांतीच्या तोंडावर ग्राहकांवर आली संक्रांत

Gold Silver Rate Today : तर मकर संक्रांतीच्या तोंडावर ग्राहकांवर दरवाढीचे संकट ओढावले आहे. देशभरात मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरी केली जाते. शनिवारपासून सोने-चांदी चमकले. दरवाढीच्या मांजाला ढील दिल्याने ग्राहकांवर संक्रांत आली. या मौल्यवान धातूत अशी झाली दरवाढ

Gold Silver Rate Today : सोने चमकले, चांदी लकलकली! मकर संक्रांतीच्या तोंडावर ग्राहकांवर आली संक्रांत
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 8:35 AM

नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : मकर संक्रांतीचा सण उद्या आहे. बाजार पेठा सजल्या आहेत. वर्षारंभीच मोठा सण आला आहे. भारतभर मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. सराफा पेठा पण या दिवसासाठी सजल्या आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीत कमालीची घसरण झाली.या दहा दिवसांत सोने 1300 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे ग्राहकांचा उत्साह दुणावला. ग्राहकांची पावलं आपोआप सराफा पेठांकडे वळली. पण सोने-चांदीने ऐन सणाच्या आदल्या दिवशीच दरवाढीची चुणूक दाखवली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर संक्रांत आली. अशी झाली मौल्यवान धातूत वाढ (Gold Silver Price Today 14 January 2024)

सोन्याचा पतंग आकाशी

सोन्याने नवीन वर्षात ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. गेल्या दहा दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरु होते. 3 जानेवारीपासून सोने घसरले होते. 4 जानेवारी 440 रुपये, 5 जानेवारी रोजी 130 रुपये, 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला 100 रुपयांनी तर 11 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. तर 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची दरवाढीला ढील

नवीन वर्षात चांदीने पण ग्राहकांचा उत्साह दुणावला. चांदीत नरमाईचे सत्र दिसून आले. 3 जानेवारी रोजी 300 रुपये, 4 जानेवारीला 2000 रुपये, 8 जानेवारी रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. 13 जानेवारी रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने महागले तर चांदी स्वस्त झाली . 24 कॅरेट सोने 62,515 रुपये, 23 कॅरेट 62,265 रुपये, 22 कॅरेट सोने 57264 रुपये झाले. 18 कॅरेट 46,886 रुपये, 14 कॅरेट सोने 36,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,530 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.