Gold Silver Rate Today | सोने एकदम सूसाट; लवकरच 70 हजारांचा टप्पा गाठणार

Gold Silver Rate Today | सोन्याने गेल्या आठवड्यात ग्राहकांना मोठा झटका दिला. चालु आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोने महागण्याचा अंदाज अगोदरच वर्तविण्यात येत होता. त्यानुसार, 1 मार्च रोजी 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. आता लवकरच सोने 70 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today | सोने एकदम सूसाट; लवकरच 70 हजारांचा टप्पा गाठणार
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 4:55 PM

नवी दिल्ली | 5 March 2024 : सोने लवकरच ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवू शकते. येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव 70 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव लवकरच मोठी चढाई करण्याचा अंदाज वर्तविण्या येत आहे. अर्थात यामागे अमेरिकेतील घडामोडी आहेत. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह सिस्टिम व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी फेड व्याजदरात कपात करु शकते. याविषयीची माहिती गुरुवारी फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल देतील. त्यामुळे सोन्यात मोठ्या घडामोडी घडतील.

या कारणांकडे कसे करणार दुर्लक्ष

  • देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • जीडीपीत देशाने मोठी झेप घेतली आहे. तर महागाई अजून आटोक्यात यायची आहे
  • या सर्व घडामोडींचा सोन्याच्या किंमतींवर मोठा परिणाम दिसू शकतो
  • मे महिन्यातच अक्षय तृतीया पण आहे. त्यामुळे सोन्याला मोठी मागणी असेल
  • त्यामुळेच सोने 70 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

सोने 70 हजारी मनसबदार

हे सुद्धा वाचा

हा कोणताही नारा नही. सोन्याचा भाव लवकरच 70 हजार रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याच्या भावात 5400 रुपयांची वाढ दिसत आहे. तर येत्या तीन महिन्यात तज्ज्ञांच्या मते सोने 8 टक्क्यांची भरारी घेऊ शकते. या वर्षात सोन्याच्या किंमतीत 1.6 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. 24 कॅरेट सोने 63,480 रुपये, 23 कॅरेट 63,226 रुपये, 22 कॅरेट सोने 58,148 रुपये झाले.18 कॅरेट 47,610 रुपये, 14 कॅरेट सोने 37,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,777 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.