Gold Price Today : सोने खरेदीदारांचे चमकले नशीब! इतके घसरले भाव

Gold Price Today : अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याज दरात वाढ केली. त्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. आज सोन्याच्या किंमतीत जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Price Today : सोने खरेदीदारांचे चमकले नशीब! इतके घसरले भाव
आज स्वस्ताई
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 10:04 AM

नवी दिल्ली : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोमवारी एका दिवसाच्या तेजीनंतर सोने (Gold Price) आणि चांदी पुन्हा स्वस्त झाले आहे. या व्यापारी आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने 217 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदीत (Silver Price) प्रति किलो केवळ 10 रुपयांची वृद्धी दिसून आली. त्यानंतर सोन्यात घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, बुधवारी, 22 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोने 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. हा भाव आज 52,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 120 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. आज हा भाव 57,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आणि खरेदीदारांना सोन्याच्या विक्रमी किंमतीपेक्षा स्वस्तात खरेदीची संधी आहे.

अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याज दरात वाढ केली. त्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या कडक धोरणाचा वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत चढउतार होत राहील. एप्रिलसाठीचे सौदे कमी किंमतीवर व्यापर करत आहेत. लग्नसराईत सोन्याची मागणी वाढल्यास किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकी होता. यादिवशी सोने 58882 रुपये प्रति दस ग्रॅमवर पोहचले होते. त्यामानाने आज सोन्याच्या किंमतीत जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदी, तिच्या विक्रमी उच्चांकापेक्षा जवळपास 12,000 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. चांदीचा ऑलटाईम हाय 79980 रुपये प्रति किलो आहे. चांदीचा आजचा भाव 68,500 रुपये प्रति किलो आहे.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,760 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....