Gold Price Today
आज (9 एप्रिल) चांदी 275 रुपयांनी घसरून 66253 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. गुरुवारी चांदी 66528 रुपये प्रतिकिलोच्या (Silver Latest Price) पातळीवर बंद झाली होती. आज रुपयामध्ये 15 पैशांची घसरण नोंदवली गेली आणि हा दर 74.75च्या पातळीवर बंद झाला. IBJA वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 8 एप्रिलला 999 शुद्धतेच्या सोन्याचे दर 46411 प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. त्याचबरोबर 999 शुद्धतेची चांदी 67219 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.
MCXवर डिलिव्हरीच्या सोन्यामध्ये घसरण दिसत आहे. दुपारी 4 वाजता जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 216 रुपयांनी घसरून 46622 रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर ट्रेड करत होता. यावेळी, ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 199 रुपयांनी घसरून 46870 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर ट्रेड करत होता.
MCXमध्ये चांदीच्या दारातही घसरण दिसून येत आहे. मे डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा दर यावेळी 679 रुपयांच्या घसरणीसह 66822 रुपये प्रतिकिलो पातळीवर ट्रेड करत होता. तर, जुलै डिलिव्हरीसाठीची चांदी 813 रुपयांनी घसरून 67705 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत होती.
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरांत घसरण दिसून येत आहे. जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव यावेळी 12.65 डॉलरनी घसरून (-0.72%) 1745.55 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करत होता. यावेळी मे डिलिव्हरीसाठीची चांदी 0.35 डॉलर (-1.37%) घसरणीसह 25.23 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर व्यापार करत होती.