Gold Silver Rate Today : सोने पुन्हा जमिनीवर, चांदी तर केव्हाच फिरली माघारी, असे आहेत भाव

| Updated on: Jul 26, 2023 | 9:19 AM

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारातील घडामोडींचा फटका सोने-चांदीला बसला. सोने पुन्हा जमिनीवर आले. तर चांदी केव्हाच माघारी फिरली आहे. काय आहे भावातील बदल, जाणून घ्या..

Gold Silver Rate Today : सोने पुन्हा जमिनीवर, चांदी तर केव्हाच फिरली माघारी, असे आहेत भाव
Follow us on

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : जुलै महिन्यात सोन्याने आघाडी उघडली होती. चांदीने भरारी घेतली होती. मे आणि जून महिन्यानंतर पहिल्यांदा किंमतींना उभारी मिळाली होती. गेल्या 20 दिवसांत दरवाढीचे सत्र सुरु होते. सोने-चांदी भावात (Gold Silver Price Today) नवीन रेकॉर्ड करण्याची आशा होती. आतापर्यंत सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. पण 21 जुलैपासून ते आतापर्यंत, एका आठवड्यात सोने-चांदीला चमकदार कामगिरी करता आली नाही. सोन्याने 60 हजारांचा पल्ला गाठला. तर चांदी किलोमागे 74,190 रुपयांवर पोहचली. दोन्ही धातूंच्या घौडदोडीला ब्रेक लागला. अमेरिकेतील घडामोडींचा हा परिपाक आहे. सध्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

किंमती जमिनीवर

  1. सोने आणि चांदीने जुलै महिन्यात मोठी उसळी घेतली होती.
  2. 21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली.
  5. 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
  6. तर 25 जून रोजी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
  7. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले.
  8. 26 जुलै रोजी सकाळच्या सत्रात अद्याप किंमतीत बदल झालेला नाही.
  9. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत पडझड

चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,143 रुपये, 23 कॅरेट 59,906 रुपये, 22 कॅरेट सोने 54,175 रुपये, 18 कॅरेट 44,357 रुपये, 14 कॅरेट सोने 34,599 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,939 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.