मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) वाढल्या आहेत. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक बदलानंतर सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सोन्याचा भाव (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 0.25 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच जुलै महिन्यात चांदीची किंमत (Silver Price) ही प्रति किलोमागे 0.59 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे देशभरात या महिन्यात सोन्याची किंमत ही प्रति दहा ग्रॅम 2,000 रुपयांनी वाढली आहे. (Gold Silver Rate Today On 31 May 2021)
सोन्याचा नवा दर (Gold Price)
सोमवारी सोन्याचा दर हा 120 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,662 रुपये इतकी झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजात सोन्याची किंमत प्रति औंस 1,900 डॉलर इतकी आहे. या महिन्यात सोन्याची किंमत तुलनेत जवळपास 8 टक्के वाढली आहे.
चांदीचे नवे दर काय? (Silver Price)
MCX वर चांदीची किंमत 425 रुपयांनी वाढून 72,036 प्रतिकिलो झाली आहे. या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी धातूंपैकी एक आहे. वाढत्या महागाईच्या सोन्याच्या किंमती सातत्याने बदलत आहेत.
महाराष्ट्रातील सोने-चांदीचे दर काय?
मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सोने-चांदीच्या किमतींमध्ये (Gold Silver Rate) मोठी दरवाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सोने हे प्रति दहा ग्रॅम 50 हजार इतके आहे. तर चांदीची किंमत ही प्रतिकिलो 70 हजारांच्या आसपास करते.
?पुणे
?सोने – 49,500 ( प्रति तोळा )
?चांदी – 71000 ( प्रति किलो )
?अहमदनगर / शिर्डी
?सोने – 48600 प्रति तोळा
?चांदी- 75000 प्रति किलो
?नाशिक
?सोने – 48,150 (24 कॅरेट)
?चांदी – 73500(प्रति किलो)
?कोल्हापूर
?सोने – 50,200 प्रति तोळा
?चांदी- 72,500 प्रति किलो
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची स्पॉट किंमत आज किरकोळ कमी झाली. मंगळवारी यूएस यील्डमध्ये वाढ झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होत आहे. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, व्यापारी आणि गुंतवणूकदार यूएस फेडच्या घोषणेची वाट पाहत आहेत. (Gold Silver Rate Today On 31 May 2021)
केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?https://t.co/fHrGk38SNN#IMD | #Monsoon | #Kerala | #Rain | @Hosalikar_KS
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या :
Petrol Diesel Price | मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
कर्जाची परतफेड करण्यात अडचण, मग हा फॉर्म भरा, SBI चा मोठा दिलासा
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका फळभाज्यांना, गृहिणींचे बजेट कोलमडले