Gold Silver Rate Today : सोन्याची उंची उडी, तर चांदीने टाकला टॉप गिअर, किंमती सूसाट

Gold Silver Rate Today : अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात वाढ केल्याचा परिणाम लागलीच दिसून आला. सोने आणि चांदीने भरारी घेतली. दोन दिवसांत किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. एक आठवडा वगळता जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी जोरदार घौडदोड केली.

Gold Silver Rate Today : सोन्याची उंची उडी, तर चांदीने टाकला टॉप गिअर, किंमती सूसाट
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात वाढ केल्याचा परिणाम लागलीच दिसून आला. सोने आणि चांदीने भरारी घेतली. दोन दिवसांत किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. एक आठवडा वगळता जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी जोरदार घौडदोड केली. गेल्या आठवड्यात सोने-चांदी दबावाखाली होते. 21 जुलैपासून भाव घसरणीवर होते. सोन्यात एक हजारांची तर चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. भाव वधारणार नाहीत, असा अंदाज बांधल्या जात होता. पण दबाव झुगारुन सोने-चांदी (Gold Silver Price Today) वधारले. सोने 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर चांदीने पण उसळी घेतली. चांदीत 400 रुपयांची वाढ झाली. चांदीने एक हजाराने झेप घेतली. किंमती प्रति किलो 78,400 रुपयांवर पोहचली.

सोन्याची मोठी झेप

26 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्यात 150 रुपयांची दरवाढ झाली. सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर 24 कॅरेट सोन्यात 170 रुपयांची वाढ झाली. हा भाव 60,320 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 27 जुलै रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीने एक हजारांची भरारी घेतली. एक किलो चांदीचा भाव 78,400 रुपये झाला. गुडरिटर्न्सनुसार, हे भाव आहेत.

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,741 रुपये, 23 कॅरेट 59,502 रुपये, 22 कॅरेट सोने 54,723 रुपये, 18 कॅरेट 44,806 रुपये, 14 कॅरेट सोने 34,949 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,426 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

अशी झाली होती घसरण

  1. 21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
  2. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली.
  3. 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
  4. तर 25 जून रोजी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
  5. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत पडझड

गुडरिटर्न्सनुसार, चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
हस्तांदोलन अन् हास्य विनोद... विधान भवनात अचानक भेट?; भेटीत दडलंय काय?
हस्तांदोलन अन् हास्य विनोद... विधान भवनात अचानक भेट?; भेटीत दडलंय काय?.
फडणवीसांसोबतच्या प्रवासानंतर ठाकरे म्हणाले, पुढील चर्चा लिफ्टमध्येच...
फडणवीसांसोबतच्या प्रवासानंतर ठाकरे म्हणाले, पुढील चर्चा लिफ्टमध्येच....
फडणवीस-ठाकरे एकत्र अन् 'हा' भाजप नेता दिसताच म्हणाले, याला बाहेर काढा
फडणवीस-ठाकरे एकत्र अन् 'हा' भाजप नेता दिसताच म्हणाले, याला बाहेर काढा.
VIDEO फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?
VIDEO फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?.
मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?
मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?.
'लालपरी'चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, या मागणीसाठी उतरणार रस्त्यावर
'लालपरी'चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, या मागणीसाठी उतरणार रस्त्यावर.
लाज वाटते, लोकमधून जनावरांसारखा प्रवास; हायकोर्टाकडून रेल्वेचे वाभाडे
लाज वाटते, लोकमधून जनावरांसारखा प्रवास; हायकोर्टाकडून रेल्वेचे वाभाडे.
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवस मेगाब्लॉक पण कधी, कुठे?
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवस मेगाब्लॉक पण कधी, कुठे?.
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?.
बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?
बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?.