Gold Silver Rates Today : सोने झळाळले तर चांदीही चकाकली, काय आहे आजचे भाव?

Gold Silver Price Today : आज सोने आणि चांदी या दोन्हीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज काय झाला बदल जाणून घेऊयात

Gold Silver Rates Today : सोने झळाळले तर चांदीही चकाकली, काय आहे आजचे भाव?
सोन्याला पुन्हा झळाळीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 3:11 PM

Gold Silver News Today : भारतीय सराफा बाजाराने (Sarafa Bazar) आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी 11 जुलै 2022 रोजी सोन्याचे दर जाहीर केले. ताज्या दरांवर नजर टाकली असता, सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) थोडी वाढ झाल्याचे दिसून आले. 999 शुद्ध असलेले म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा दर आज 50,924 रुपये इतका होता. तर 999 शुद्ध चांदी 56,466 रुपये प्रति किलो विक्री होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) डॉलरकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. त्यातच डॉलर इंडेक्स(Index Dollar) मध्ये ही मोठी तेजी आल्याने सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेतील महागाईचा आकडा, डॉलर इंडेक्स, फेडरल रिझर्व एक्शन आणि आर्थिक मंदी बाबतची माहिती याचा संपूर्ण परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येईल. भारतात या आठवड्यात सोन्याच्या किंमती दोन हजारांच्या दरम्यान खेळत होत्या. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि उत्पादन शुल्क यासह विविध घटकांचा सोन्याच्या किमतीवर दररोज परिणाम होतो.

दिवसभरात दोन वेळा सोन्या चांदीचे दर जाहीर करण्यात येतात. त्यानुसार, सकाळून एक भाव असेल तर संध्याकाळी तुम्हाला सोन्या चांदीच्या भावात फरक जाणवू शकतो. ibjarates.com नुसार, 999 शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. हे सोने प्रति 10 ग्रॅम 50,924 रुपये दर आहे. तर 999 शुद्ध असलेल्या चांदीचा भाव वाढला आहे. एक किलो चांदीचा भाव 56,466 रुपये झाला आहे. 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी 50720 रुपये झाला आहे .750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी 38193 रुपये झाला आहे

हे सुद्धा वाचा

सोन्या चांदीच्या दरात काय झाला बदल

सोन्या चांदीचे भाव दररोज बदलतात. आज सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली. 999 शुद्ध आणि 995 शुद्ध सोन्याचा आजचा भाव 71 रुपये, 916 शुद्ध सोन्याचे दर 61 रुपये तर 750 शुद्ध सोन्याच्या दरात 53 रुपये आणि 585 शुद्ध सोन्याच्या भावात 42 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीच्या किंमतीत आज 39 रुपयांची वाढ दिसून आली.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

शुद्ध सोन्याची ओळख अशी करा

सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.