Gold Silver Rate Today : सोन्याच्या किंमतींना झटका, चांदीची माघार, गाठा लवकर सराफा बाजार
Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतींना मोठा झटका बसला. जागतिक बाजारात सोने-चांदी पेक्षा तांब्याची मागणी वाढल्याने समीकरणं बदलली. सोन्यात दोन दिवसांत मोठी वाढ झाली नाही. काय आहेत लेटेस्ट भाव..
नवी दिल्ली : सोने आणि चांदी हे महागडे धातू आहेत. त्यांच्याकडे संपत्ती म्हणून पाहिले जाते. आयुर्वेदिक उपचारांपासून तर काही आधुनिक उत्पादनात चांदीचा मोठा वापर होत आहे. त्यानंतर तांब्याचा क्रमांक लागतो. पण जागतिक बाजारात मोठा उलटफेर झाला आहे. सोने आणि चांदीपेक्षा तांब्याची मागणी वधारली आहे. त्यामुळे किंमतींनी पण उसळी घेतली आहे. वायदे बाजारातही तांब्याची (Copper Price Hike) आगेकूच सुरु आहे. अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह महागाई आटोक्यात येण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच महिन्यात याविषयीचा निर्णय होणार आहे. या घडामोडींचा सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांत स्थानिक बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) मोठी उलथापालथ झालेली नाही.
तांब्याला सोन्याचे दिवस अमेरिकेनंतर जागतिक बाजारात चीन पण खेळी खेळत आहे. चीनने तांबे खरेदीची मोठी ऑर्डर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन तांब्याची मोठी आयात करत आहे. स्पेस स्टेशन, कृत्रिम सूर्य, मंगळावरील मोहीम तसेच अनेक उद्योगांसाठी तांब्याची चीनने मोठी आयात केली होती. त्यात पुन्हा चीनने मागणी वाढवली आहे. त्यामुळे तांब्याला सोन्याचे दिवस आले आहेत. एक किलो चांदीचा भाव गुडरिटर्ननुसार, 73,400 रुपये आहे.
जुलै महिना पावला सोने-चांदीला जुलै महिना पावला म्हणायचा, कारण या महिन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंनी जोरदार मुसंडी मारली. दोन्ही धातूंच्या किंमती चांगल्याच वधारल्या. 8 जुलै रोजी सोन्याने रॉकेट भरारी घेतली होती. किंमती 400 रुपयांनी वधारल्या होत्या. तर त्यापूर्वी 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली होती. महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 जुलै रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7 आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली होती. आज सकाळी भाव अपडेट झाले नाहीत. काल 22 कॅरेट सोने 54,600 रुपये तर 24 कॅरेट सोने 59,560 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 जुलै, 24 कॅरेट सोने 58,656 रुपये, 23 कॅरेट 58,421 रुपये, 22 कॅरेट सोने 53,729 रुपये, 18 कॅरेट 43992 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34314 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.