Gold Silver Price : खरेदीदारांना लागली लॉटरी! 10 ग्रॅम सोने झाले इतके स्वस्त

Gold Silver Price : खरेदीदारांना या आठवड्यात सोने खरेदीची लॉटरी लागली. सोने स्वस्त झाले. चांदीतही घसरण दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या दोन्ही किंमती धातूमध्ये गुंतवणूक वाढवली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत वाढ झाली असली तरी देशात भावात मोठी उसळी आलेली नाही.

Gold Silver Price : खरेदीदारांना लागली लॉटरी! 10 ग्रॅम सोने झाले इतके स्वस्त
सोने झाले इतके स्वस्त
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:16 AM

नवी दिल्ली : सोने आणि चांदी (Gold Silver Price) खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. सध्या सोने 2700 रुपये प्रति 10 ग्रॅमने तर चांदी 15800 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली. खरेदीदारांना या आठवड्यात सोने खरेदीची लॉटरी लागली. सोने स्वस्त झाले. चांदीतही घसरण दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या दोन्ही किंमती धातूमध्ये गुंतवणूक वाढवली. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमती घसरल्या आहेत. त्याचा ही फायदा मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव 56000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आताबाहेर तर चांदीचा भाव 64000 रुपये प्रति किलो आहे. अमेरिकन डॉलरच्या (Dollar) भावाचा हा परिणाम दिसून आला. डॉलर मजबूत होत असल्याने जगभरातील सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्यात 50 रुपयांनी वाढ होऊन भाव 51,950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्यात घसरण 50 रुपयांची होऊन किंमत 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.

या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी सोन्याचा भाव 16 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. सोने 56103 रुपये झाले. गुरुवारी सोने 53 रुपये प्रति 10 स्वस्त होते. या आठवड्यात बुधवारी सोने 590 रुपये प्रति 10 महागले होते. हा भाव 56140 रुपये होता. मंगळवारी सोने 116 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. तर सोमवारी सोने 291 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 55666 रुपये हा भाव होता.

सोन्यातील या चढउताराने 24 कॅरेट सोने 16 रुपयांनी महागले, हा भाव 56103 रुपये, 23 कॅरेट सोने 52 रुपयांनी महागून 55878 रुपये, 22 कॅरेट सोन्यात 49 रुपयांची वाढ होऊन भाव 51390 रुपये, 18 कॅरेट सोने 40 रुपयांनी वधारुन 42077 रुपयांवर पोहचले. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 32 रुपयांनी महागला. हे सोने 32820 रुपये प्रति 10 ग्रॅमने विक्री होत आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्याने 2 फेब्रुवारी रोजी उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या 2700 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव उतरले आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने 58,470-58882 रुपये या दरम्यान होता. चांदीने 79980 रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या चांदी 16274 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे.

गुडरिटर्न्सनुसार,मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,880 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,580 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.