Gold Loan: सोन्यावर सोन्यासारखी संधी; या 5 बँका देत आहेत स्वस्तात गोल्ड लोन

Gold loan Interest rate: सुवर्ण कर्ज हे बँकांसाठी सर्वात सुरक्षित कर्ज असते. कारण तुम्ही कर्जाची परतफेड करू शकला नाही तर बँकांकडे तारण असलेले सोने फायदेशीर ठरते. तुम्ही सोने गहाण ठेवत असल्याने ग्राहकाला या कर्जावर कमी व्याज आकारले जाते.

Gold Loan: सोन्यावर सोन्यासारखी संधी; या 5 बँका देत आहेत स्वस्तात गोल्ड लोन
स्वस्तात सुवर्ण कर्जाची संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 3:24 PM

नवीन व्यवसाय सुरु करायचा, घर बांधायचे अथवा विवाहकार्य यासाठी मोठी रक्कम हाताशी लागते. परदेशात शिक्षणासाठी जाण्याची तरतूद करणे ही तोंडाचा खेळ नाही. मोठ्या कार्याच्यावेळी हाती खेळते भांडवल लागते. जर हा पैसा गाठीशी नसला तर आपल्याला कर्ज घेण्याची वेळ येते. नोकरदार वर्गाला तर सहज कर्ज मिळते. पण जर अत्यंत निकड असेल आणि कर्ज हवे असेल तर सुवर्ण कर्ज (Gold Loan) हा तुमच्यासाठी एक महत्वाचा पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड लोनवरील व्याजदर(Interest Rate) ही कमी असते आणि बँका (Bank) हे कर्ज ही लवकरात लवकर मंजूर करतात. कर्जाची रक्कम ही लागलीच तुमच्या खात्यात जमा होते. सोन्याची गुणवत्ता तपासून (Gold quality) आणि सोन्याचे वजन (Gold Weight) केल्यानंतर तुमचे कर्ज त्वरीत मंजूर करण्यात येते. त्यानंतर काही कागदपत्रांची पुर्तता करुन आणि केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करुन कर्ज रक्कम खात्यावर जमा करण्यात येते. या 5 बँका गोल्ड लोनवर अत्यंत कमी व्याज दर आकारतात, त्याविषयी जाणून घेऊयात.

 साऊथ इंडियन बँकेचा व्याजदर कमी

खासगी क्षेत्रातील बँक साऊथ इंडियन बँक 7 टक्के व्याजदराने ग्राहकांना सोन्यावर कर्ज पुरवठा करत आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र 7.20 टक्के दराने गोल्ड लोन देत आहे. इंडियन बँकेचा व्याजदर 7.35 टक्के आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक आहे, ही बँक गोल्ड लोनवर 7.40 टक्के व्याज दर आकारत आहे. तर बँक ऑफ इंडिया गोल्ड लोनवर 7.50 टक्के व्याजदर आकारत आहे. सुवर्ण कर्जावर सर्वात कमी व्याज आकारणा-या या पाच बँका आहेत. तर इतर बँका गोल्ड लोनवर अधिकचे व्याजदर आकारतात. तसेच तुमचा हप्ता चुकला अथवा हप्ता भरायला उशीर झाला तरीही तुम्हाला भुर्दंड बसतो. बँक अशावेळी अतिरिक्त व्याज वसूल करते. त्यामुळे त्याचा फटका तुम्हाला बसतो.

हे सुद्धा वाचा

1.5 कोटींपर्यंत घेता येते कर्ज

सोन्याचे वजन आणि गुणवत्ता तसेच तुमची गरज यानुसार सोन्यावर कर्ज मिळते. सोन्यावर कमीत कमी 20 हजार रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. गोल्ड लोनचा कालावधी हा 3 महिने ते 24 महिन्यांपर्यंत असतो. प्रत्येक बँकेची कर्ज पुरवठा रक्कम आणि कालावधी वेगवेगळा आहे. प्रत्येक बँकेच्या शाखेत गेल्यावर सुवर्ण कर्जाविषयी सविस्तर माहिती मिळेल.

या गोष्टीही ठेवा लक्षात

सोन्याची गुणवत्ता आणि वजनावर कर्जाची प्रक्रिया अवलंबून असते बँका सुवर्ण कर्ज कमी व्याजदरावर देतात एकूण किंमतीच्या केवळ 65 ते 75 टक्के कर्ज मिळते कर्जाची परतफेड चुकल्यास अतिरिक्त भूर्दंड पडतो कर्ज फेड न जमल्यास बँक सोन्याची विक्री करु शकते

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.