Gold Silver Price Today : वाटा मिठाई, चला खरेदीला! सोन्यााच तोरा उतरला, आजचा भाव माहिती करुन घ्या

Gold Silver Price Today : आज, मंगळवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. गेल्या दहा दिवसांपासून सोन्याची दमदार बँटिंग सुरु आहे. गेल्या दोन गुरुवारपासून सोन्याने विश्रांती घेतली आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरण झाली.

Gold Silver Price Today : वाटा मिठाई, चला खरेदीला! सोन्यााच तोरा उतरला, आजचा भाव माहिती करुन घ्या
मिस्ड कॉलवर भाव
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:23 AM

नवी दिल्ली : अमेरिकेसह युरोपातील बाजारात सातत्याने घडामोडी घडत आहे. येथील बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) भूकंप आला आहे. बँकांना धडाधड कुलूप लागत आहे. बँकांच्या दिवाळखोरीचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी (Share Market) आपला मोर्चा सोने-चांदी गुंतवणुकीकडे लावला आहे. या जागतिक घडामोडींमुळे भारतीय सराफा बाजारात उलटफेर सुरु आहे. सोन्याने एकदम उसळी घेतली आहे. तर चांदीच्या किंमती पण सूसाट आहेत. आज मंगळवारी या दरवाढीला ब्रेक लागला. सकाळच्या सत्रात गुडरिटर्ननुसार, सोने आणि चांदीचे भाव घसरले (Gold Silver Price Today) आहेत. 28 मार्च रोजी सोन्याने रेकॉर्ड केला होता. 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. आता सोने आणि चांदी अजून किती लंबी उडी मारणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

चांदीची आगेकूच

चांदीने आतापर्यंत जोरदार उसळी घेतली आहे. चांदी किलोमागे एक हजारांनी वधारली आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीची किंमत 73,300 हजार रुपये किलो आहे. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती. त्यापेक्षा चांदीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

हे सुद्धा वाचा

भावाला ब्रेक

आज 28 मार्च रोजी, सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 500 रुपयांची घसरण होऊन भाव 54,900 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 110 रुपयांची घसरण होऊन सकाळच्या सत्रात हा भाव 59,880 रुपये होता. 18 मार्चपासून विचार करता सोन्यात प्रति तोळा आज जवळपास 600 रुपयांची घसरण झाली आहे.

असा देतात हॉलमार्क

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

एका मिस्ड कॉलवर भाव

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.