Gold Silver Price : लग्नसराईत आनंदाला उधाण! सोने झाले इतके स्वस्त

Gold Silver Price : वायदे बाजारात सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा प्रति 10 ग्रॅमवर जवळपास 3400 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. चांदी काल 70,000 रुपयांच्या स्तरावर व्यापार करत होती. त्यानंतर हा भाव 62,000 रुपयांपर्यंत घसरला.

Gold Silver Price : लग्नसराईत आनंदाला उधाण! सोने झाले इतके स्वस्त
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली  :  देशात लग्नसराई जोरात सुरु आहे. विवाह सोहळे धुमधडाक्यात सुरु आहेत. सोने-चांदीच्या दरही (Gold-Silver Price Today) हिंदोळ्यावर आहेत. सोने यंदा सातत्याने घसरणीवर आहे. 2 फेब्रुवारीने मात्र सोने-चांदीने खरेदीदारांना जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर सोने वर्षातील सर्वात नीच्चांकावर पोहचले. यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 58,800 स्तरावर पोहचला होता. तर आता हा दर 55,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड त्याच्या दोन महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचले. वायदे बाजारात सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरुन प्रति 10 ग्रॅम जवळपास 3,400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीनेही 70,000 हजार रुपयांची कामगिरी बजावली. चांदी जवळपास 7,000 रुपयांनी स्वस्त झाली. सध्या 62,000 रुपये किलोंचा भाव सुरु आहे. सराफा बाजारात सोन्याचा 55,500 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव सुरु आहे.

वायदे बाजारात सोन्या-चांदीचे दर (MCX Gold-Silver Price Today) सातत्याने दबावाखाली आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून सोने दबावात (MCX Gold) आहे. मंगळवारी, 28 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी बाजार उघडला तेव्हा 55,400 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव होता. गेल्या सत्रात 55,476 रुपये किंमतीवर व्यापार बंद झाला. सिल्वर फ्यूचरमध्ये (Silver Future Price) 49 रुपये वा 0.08% नुकसान झाले, हा भाव 62,915 रुपये प्रति किलो सुरु आहे. सोमवारी हा भाव 62,964 रुपयांवर बंद झाला होता.

सराफा बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. त्याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून आला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात (Spot Gold Price) 185 रुपयांची घसरण झाली. भाव 55,520 रुपये प्रति 10 वर आले. गेल्या व्यापारी सत्रात सोने 55,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. चांदीच्या किंमती 798 रुपयांनी घटल्या. चांदी 63,227 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,120 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,120 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,120 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,480 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,150 रुपये आहे.

IBJAने (India Bullion And Jewellers Association Ltd.) 14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price in Karat) जाहीर केला आहे.

Gold Jewellery Retail Selling Rate – Fine Gold (999)- 5,567 – 22 KT- 5,433 – 20 KT- 4,954 – 18 KT- 4,509 – 14 KT- 3,590 – Silver (999)- 63,446

( सोन्याचे हे भाव प्रति ग्रॅमवर आधारीत आहेत. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज जोडण्यात आलेले नाहीत.)

IBJA वरील कालचे भाव – 999- 55,666 रुपये प्रति 10 ग्रॅम – 995- 55,443 – 916- 50,990 – 750- 41,750 – 585- 32,565 – Silver- 63,446

( सोन्याचा हा भाव प्रति 10 चे आहेत. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज जोडण्यात आलेले नाहीत.)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.