Edible Oil Price : खुशखबर, खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! रेकॉर्डब्रेक आयातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा

Edible Oil Price : गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात 57,95,728 टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. तर यंदा मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात खाद्य तेल आयातीत 22 टक्के वाढ झाली. देशात 70,60,193 टन आयात करण्यात आले.

Edible Oil Price : खुशखबर, खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! रेकॉर्डब्रेक आयातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 11:58 AM

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे. महागाई डोक्यावर नाचत असताना, खाद्यतेलाच्या (Edible Oil Price) आघाडीवर पुन्हा त्यांना दिलासा मिळाला. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरल्या. केंद्र सरकारने भरमसाठ तेलाची आयात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. किचन बजेट बिघडता बिघडता वाचले. यापूर्वी ही खाद्य तेलाने सुवार्ता दिली होती. दूध, इतर खाद्यपदार्थ, अन्नधान्य, खाद्यान्न, अन्नधान्य याचे भाव मात्र अजून कमी झालेले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून इंधनाची किंमत (Petrol Diesel Price) कमी होईल, या आशेवर भारतीय आहेत.

बाजारात भीतीचे वातावरण खाद्यतेलाच्या रेकॉर्डब्रेक आयातीमुळे, स्थानिक तेल-तेलबियांच्या बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली बाजारात शनिवारी, तेल-तेलबियांच्या किंमतीत (Edible Oil Price) घसरण दिसून आली. मोहरी, सोयाबीन, कच्चे पामतेल (CPO), पामोलीन आणि कापसाच्या तेलाच्या किंमती घसरल्या. तर शेंगदाणा तेल, तेलबियांच्या किंमतीत कुठलाच बदल झाला नाही.

22 टक्के आयात वाढली बाजारातील सूत्रांनुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात 57,95,728 टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. तर यंदा मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात खाद्य तेल आयातीत 22 टक्के वाढ झाली. देशात 70,60,193 टन आयात करण्यात आले. तर खाद्यतेलाची 24 लाख टनाची खेप अद्याप भारतीय किनारपट्टीला येऊन धडकलेली नाही. त्यानंतर किंमती अजून घसरण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय मिल वाचावा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाम आणि पामोलीन तेलाचा आयात होत असल्याने स्थानिक शेतकरी आणि मिल उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे आयात शुल्कात (Import Duty) वाढीची मागणी करण्यात येत आहे. सध्या 7.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येते. ते 15 टक्के करण्याची मागणी साल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनने (SEA) केली आहे. पण या मागणीमुळे पामोलीन तेल, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे भाव वाढण्याची भीती आहे.

शनिवारी तेल आणि तेलबियांचे भाव पुढीलप्रमाणे होते

  1. मोहरी तेलबिया – रु 5,105-5,200 (42% स्थिती दर) प्रति क्विंटल
  2. भुईमूग – 6,790-6,850 रुपये प्रति क्विंटल
  3. शेंगदाणा तेल गिरणी वितरण (गुजरात) – रुपये 16,660 प्रति क्विंटल
  4. शेंगदाणा रिफाइंड तेल 2,535-2,800 रुपये प्रति टिन
  5. मोहरीचे तेल दादरी – 9,980 रुपये प्रति क्विंटल
  6. मोहरी पक्की घनी – रु. 1,595-1,665 प्रति टिन
  7. मोहरी कच्ची घणी – रु. 1,595-1,715 प्रति टिन
  8. तीळ तेल गिरणी वितरण – रु. 18,900-21,000 प्रति क्विंटल
  9. सोयाबीन तेल मिल डिलिव्हरी दिल्ली – रु 10,780 प्रति क्विंटल
  10. सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर – रु 10,600 प्रति क्विंटल
  11. सोयाबीन तेल दिगम – रु 8,950 प्रति क्विंटल

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.