EPFO सदस्यांची पाचही बोटं तुपात! पैसे काढताना सुद्धा असा फायदा होणार, जमा रक्कमेवर अधिक व्याज मिळणार

EPFO Interest Rate : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. देशातील जवळपास 7.50 कोटी सक्रिय सदस्यांना हा मोठा दिलासा आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा करतानाच नाही तर आता पैसे काढताना सुद्धा भरभक्कम व्याज मिळेल.

EPFO सदस्यांची पाचही बोटं तुपात! पैसे काढताना सुद्धा असा फायदा होणार, जमा रक्कमेवर अधिक व्याज मिळणार
ईपीएफओ सदस्यांना लागली लॉटरी
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 4:50 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. जवळपास 7.50 कोटी सक्रिय सदस्यांना प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा करतानाच नाही तर पैसे काढताना पण भरभक्कम व्याज मिळणार आहे. ईपीएफओने क्लेम सेटलमेंट दरम्यान जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर सध्या दावा निकाली काढण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो, तो घटवण्यासाठी पाऊलं टाकण्यात येत आहे.

काय आहे नियम

ईपीएफ योजनेतंर्गत महिन्याच्या 24 तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंटसाठी येणाऱ्या अर्जावर केवळ मागील महिन्याचे व्याज देण्याची तरतूद होती. पण आता नवीन नियमानुसार, ईपीएफ सदस्यांना प्रोव्हिडंट फंडवर देण्यात येणाऱ्या व्याज नियमात बदल करण्यात आला आहे. आता क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज देण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (CBT) ईपीएफओला परवानगी दिली आहे. ईपीएफ योजना 1952 मधील 60(2)(B) नियमात त्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरच नियमाची अंमलबजावणी

केंद्र सरकारने या बदलाचे गॅझेटमध्ये प्रकाशन केल्यानंतर नवीन नियम लागू होईल. हा नियम सेवा निवृत्तीवेळी संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी देतो. तर 55 वर्षावेळी सेवेतून निवृत्ती, अपंगत्व आल्यास पीएफ खाते बंद करावे लागल्यास हा नवीन नियम लागू होईल. तर सलग दोन महिने बेरोजगार असल्यास नवीन नियमानुसार पीएफ खात्यातून रक्कम काढण्यावर नवीन नियमानुसार व्याज मिळेल.

10 वर्षांत नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळण्यासाठी पात्र

जर कर्मचारी EPFO मध्ये दरमहा योगदान देत असेल आणि त्याने 10 वर्षे नोकरी केली तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो. ही पेन्शन त्याला वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात येते. 50 वर्षानंतर सुद्धा पेन्शन मिळू शकते. पण त्यामध्ये नियमानुसार कपात होते.

मुदत वाढवली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक नवीन रोजगार लिंक्ड इन्सेटिव्ह (ELI) योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी UAN सक्रिय (Activation) आणि बँक खात्याला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. आता या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी, 2025 रोजीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ही अंतिम मुदत या दोन महिन्यात दोनदा वाढवण्यात आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.