Mutual Funds : गुंतवणकूदारांसाठी गुड न्यूज! आता खात्यात लवकर जमा होणार पैसे, काय झाला बदल

Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना आता रक्कमेसाठी ताटकाळत रहावे लागणार नाही.

Mutual Funds : गुंतवणकूदारांसाठी गुड न्यूज! आता खात्यात लवकर जमा होणार पैसे, काय झाला बदल
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 10:01 AM

नवी दिल्ली : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी (Mutual Fund Investor) खुशखबर आहे. गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी त्यांना आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. आता म्युच्युअल फंडातील रक्कम तात्काळ खात्यात (Account) जमा होणार आहे. त्यासाठी ताटकाळत रहावे लागणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजीपासून हा नियम लागू होईल. त्याचा फायदा देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना होणार आहे. आता दोन दिवसांत रिडेम्पशन केलेली रक्कम खात्यात जमा होईल. शेअर बाजारात (Share Market) 27 जानेवारी 2023 पासून T+ Settlement चा नियम लागू झाला. त्यामुळे शेअर बाजारातील युनिट विक्रीची रक्कम त्याच दिवशी संध्याकाळी खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता मुच्युअल फंडच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनीही नवीन धोरण अंगिकारले आहे. गुंतवणूकदाराने रक्कम काढण्यासाठी विनंती केल्यानंतर व्यवहार प्रक्रियेतील दोन कामकाजाच्या दिवसांत (T+2) ही रक्कम खात्यात जमा होईल.

सध्या, म्युच्युअल फंड युनिट्स युनिट रिडेम्पशन केल्यानंतर साधारणतः तीन दिवसांत रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते. आता हा कालावधी एका दिवसाने कमी झाला आहे. अर्थात त्याच दिवशी रक्कम खात्यात जमा व्हावी अशी मागणी गुंतवणूकदारांची आहे.

हे सुद्धा वाचा

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI), ही भारतातील म्युच्युअल फंड व्यवस्थापकांची संघटना आहे. या संघटनेने याविषयीचे एक निवेदन दिले आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजीपासून, बजेटच्या दिवसापासून हा नियम लागू होईल.

या नियमामुळे गुंतवणूकदाराला साधारणतः दोन दिवसांत ही रक्कम मिळेल. त्याच्या बँका खात्यात ही रक्कम जमा होईल. सध्या तीन दिवसांत ही रक्कम जमा होते. आता एक दिवसांचा कालावधी कमी होणार आहे. अडचणीवेळी ही रक्कम गुंतवणूकदाराला उपयोगी ठरेल.

अर्थात गुंतवणूकदारांची मागणी याहून वेगळी आहे. त्यांना रिअल टाईममध्ये ही रक्कम खात्यात हवी आहे. त्यासाठी काही तांत्रिक आणि व्यवस्थापनाविषयक अडचणी आहेत. पण निदान एका दिवसात, 24 तासांत ही रक्कम जमा व्हावी अशी अपेक्षा गुंतवणूकदारांची आहे. शेअर बाजारासारखंच T+ Settlement ची मागणी करण्यात येत आहे. पण यामध्ये काही अडचणी आहेत.

शेअर बाजारात T+1 सुविधेमुळे गुंतवणूकदारांना निधी आणि शेअरमध्ये तेजीने ट्रेड सेटलमेंट करता येत आहेत . त्यांच्या खात्यात आता पूर्वीपेक्षा एक दिवस आधी रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेटलमेंटची सायकल आता लवकर पूर्ण होत आहे.

शेअर बाजारात खरेदीदार आणि विक्री करणारे यांच्यात ट्रेड पूर्ण झाला की रक्कम ही लवकर मिळेल. जुन्या नियमामुळे सेटलमेंटसाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. पण आता एका दिवसातच ट्रेड सेटलमेंट होत आहेत.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.