एसबीआय ग्राहकांसाठी चांगली बातमी ! आता घरबसल्या बदलू शकता बँक शाखा
कोरोना महामारीमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने ही सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत आपले एसबीआय खाते एका शाखेतून दुसर्या शाखेत सहजपणे हस्तांतरीत केले जाऊ शकते. यासाठी बँकेत जाऊन अर्ज देण्याची गरज भासणार नाही. (Good news for SBI customers! Now you can change bank branches at home)
नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांना बँकेत पायपीट करावी लागू नये म्हणून बँका आता ऑनलाईन सुविधांमध्ये वाढ करीत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानेही ग्राहकांना दिलासा देत बँक शाखा बदलण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आता ग्राहक सहजपणे घरी बसून त्यांची एसबीआय बँक शाखा (Transfer Bank Account) सहज बदलू शकतात. यासाठी त्यांना काही प्रक्रिया पाळाव्या लागतील. कोरोना महामारीमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने ही सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत आपले एसबीआय खाते एका शाखेतून दुसर्या शाखेत सहजपणे हस्तांतरीत केले जाऊ शकते. यासाठी बँकेत जाऊन अर्ज देण्याची गरज भासणार नाही. (Good news for SBI customers! Now you can change bank branches at home)
या प्रक्रियेद्वारे करा बँक खाते हस्तांतरीत
1. शाखा बदलण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला Onlinesbi.com भेट द्या. येथे आपला आयडी-पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा. 2. आता ‘पर्सनल बँकिंग’ पर्याय निवडा आणि वापरकर्त्याचे नाव व पासवर्ड प्रविष्ट करा. 3. ई-सेवा टॅबवर येथे क्लिक करा. यानंतर ट्रान्सफर सेव्हिंग अकाऊंटवर क्लिक करा. 4. आपले खाते येथे निवडा जे आपण हस्तांतरीत करू इच्छित आहात. याशिवाय ज्या शाखेमध्ये तुम्हाला तुमचे खाते हस्तांतरीत करायचे आहे त्या शाखेचा आयएफएससी कोड प्रविष्ट करा. 5. सर्व तपशील तपासल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. ते भरून पुष्टी करा. 6. या प्रक्रियेद्वारे तुमची विनंती इतर बँक शाखेत पोहोचेल. ते मान्य होताच शाखा हस्तांतरणाची माहिती आपल्या नोंदणीकृत क्रमांकावर बँकेमार्फत दिली जाईल. 7. आपणास पाहिजे असल्यास आपण योनो एसबीआय आणि योनो लाईट अॅपद्वारे आपली बँक शाखा देखील बदलू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे. (Good news for SBI customers! Now you can change bank branches at home)
Video : Genelia Deshmukh कडून अनोख्या पद्धतीने International Mother’s Day च्या शुभेच्छा@geneliad pic.twitter.com/Apnuv5bvhM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
इतर बातम्या
तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण
IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान