आली चांगली बातमी, या सरकारी बॅंकेने गृहकर्जाच्या व्याजदरात केली मोठी कपात

होळीच्या मुहूर्तावर या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बॅंकेने आपल्या आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात मोठी कपात केली आहे.

आली चांगली बातमी, या सरकारी बॅंकेने गृहकर्जाच्या व्याजदरात केली मोठी कपात
EMIImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 8:18 AM

नवी दिल्ली  : रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक बॅंका होम आणि कार लोन सह सर्व प्रकारच्या लोनमध्ये वाढ करीत आहेत. मात्र सरकारी क्षेत्रातील मोठी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदा हिने आपल्या लाखो ग्राहकांसाठी गुड न्यूज आणली आहे. बॅंक ऑफ बडोदाने होळीच्या मुहूर्तावर आपल्या होम लोनच्या व्याजावर मोठी कपात केली आहे. बॅंक ऑफ बडोदाने आपल्या होम लोनच्या व्याज दरात 0.40 टक्के कपात करीत ते 8.5 टक्के केले आहे. या निर्णयामुळे अनेकांचा ईएमआयचा भार कमी होणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बॅंक पैकी एक असलेल्या बॅंक ऑफ बडोदाने आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. याच सह या बॅंकेने आपल्या होम लोनसाठीच्या प्रोसेसिंग फीलाही पूर्णपणे समाप्त केले आहे. बॅंक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनूसार व्याजदरात केलेला हा बदल पाच मार्च 2023 ते 31 मार्च2023 पर्यंतच राहणार आहे.

व्यापारासाठी मिळणार स्वस्तात लोन

बॅंक ऑफ बडोदाने व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. बिझनेससाठी देण्यात येणाऱ्या एमएसएमई लोनवरील व्याज दरातही बॅंक ऑफ बडोदाने कपात केली आहे. एमएसएमई लोनवरील व्याज दर 8.4 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक ऑफ बडोदाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की व्याजदराबाबत घेतलेले हे दोन्ही निर्णय पाच मार्च 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत लागू राहणार आहेत. बॅंकेने म्हटले आहे की उद्योगधंद्यातील हे सर्वात कमी आणि व्यवसायाला उत्तेजन देणारे हे व्याजदर आहेत. तसेच बॅंकेने होम लोनसाठीच्या प्रक्रीया शुल्क पूर्ण पणे माफ केली आहे. तर एमएसएमई कर्जावरील प्रक्रीया शुल्कात पन्नास टक्के कपात केली आहे.

रेपोरेट वाढल्याने होम लोन महाग झाले

रिझर्व्ह बॅंकेने मे 2022 नंतर रेपोरेटमध्ये 2.50 टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये सुद्धा रेपोरेट दर 0.25 टक्के वाढून 6.50 टक्के झाले होते. यामुळे देशातील अनेक बॅंकांनी होम लोनच्या व्याज दरात अनेक वेळा वाढ केली आहे. कोरोना नंतर अनेकांचे उत्पन्न घटले आहे. तर महागाईत वाढ झाली आहे. होम लोन, कार लोनसह अनेक कर्जाचे हप्ते ईएमआय वाढले आहेत. बॅंक ऑफ बडोदाच्या या निर्णयाने होम लोन घेणाऱ्यांचा फायदा होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.