Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google ला भारतात तब्बल 1,337 कोटी रुपयांचा दंड! दंडामागचं कारण काय?

Google चं नेमकं काय चुकलं की त्यांच्याकडून तब्बल हजारो कोटींचा दंड वसूल केला जाणार?

Google ला भारतात तब्बल 1,337 कोटी रुपयांचा दंड! दंडामागचं कारण काय?
का ठोठावला गुगलला दंड?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 7:35 AM

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई :भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) सर्च इंजिनमधील प्रसिद्ध नाव असलेली कंपनी गुगलला (Google Search Engine) मोठा दणका दिलाय. गुगलकडून आयोगने तब्बल 1 हजार 337 कोटी रुपयांचं दंड ठोठावलाय. बाजारात असलेल्या आपल्या स्थानाचा चुकीचा वापर गुगलने केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. एड्रॉईड मोबाईल डिव्हाइस (Android Mobile Device) इकोसिस्टमच्या क्षेत्रात गुगलने आपल्या ताकदवर स्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय सीसीआय अर्थात भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुगला आपली गैरवर्तवणूक सुधारावी, अशा इशाराही दिलाय. मर्यादित वेळेत गुगलने आपली चूक सुधारावी, असे निर्देश गुगलला आयोगाकडून देण्यात आलेत.

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुरुवारी याबाबती माहिती दिली. नॉन ओएस वेब स्पेसिफिक वेब ब्राऊजर मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी गुगलने ऍप स्टोर मार्केटमध्ये आपल्या सद्यस्थितीचा गैरवापर केल्याचं आयोगाने म्हटलंय. त्याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

आता गुगलला एक मर्यादित वेळ आखून देण्यात आली आहे. या वेळेत त्यांनी आपण केलेली चूक सुधारावी, असा आयोगाने म्हटलं आहे. शिवाय 1 हजार 337.76 कोटी रुपयांचा आर्थिक दंडही गुगलकडून आकारला जाईल, असंही स्पष्ट केलं आहे.

याआधीही गुगलच्या विरोधात चौकशी आदेश काढण्यात आलेत होते. याच महिन्यात गुगलविरोधात चौकशी आदेश देण्यात आले होते. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी आपल्या आदेशात चौकशी अहवाल देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. हा अहवाल पोलीस महासंचालकांना देण्यात येणार आहे.

गुगलच्या विरोधात न्यूज ब्रॉडकास्टर्स एन्ड डिजिटल असोसिएशनने एक तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन गुगलबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सर्च इंजिनवर एका विशिष्ट संस्थेच्या वेबलिंकला प्राथमिकता देण्यासाठी गुगल इतर संस्थांची माहिती देण्यासाठीही भाग पाडत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

गेल्या काही काळापासून गुगलवर सातत्यानं सवाल उपस्थित केले जात आहेत. भारताशिवाय युरोप, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही गुगलवर गंभीर आरोप करण्यात आलेत. गुगल शॉपिंगला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप युरोपात केला जातोय. तसंच काही ठराविक जणांना प्राधान्य देणं आणि ऑनलाईन जाहिरातींमध्ये स्पर्धा संपवण्याचाही आरोपही गुगलवर करण्यात आला आहे. अमेरिकेत गुगल पे सर्विस आणि काही विशिष्ट सर्च रिझल्ट देण्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यावरुन गुगलवर कित्येक अरब डॉलरचा दंड वसून करण्यात आला होता.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.