ITR Declaration साठी तुमच्या HR चा मेल आला ? आला असेल तर नक्की वाचा

दरवर्षी तुमच्या पगारातून कर कापला जाऊ नये यासाठी आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच नोकरदारांना पूर्ण वर्षाचे प्लॅनिंग करून डीक्लेरेशन द्यावे लागते. म्हणजेच कशामध्ये गुंतवणूक करून कर वाचवाल याची माहिती द्यावी लागते.

ITR Declaration साठी तुमच्या HR चा मेल आला ? आला असेल तर नक्की वाचा
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 7:11 PM

दरवर्षी तुमच्या पगारातून कर कापला जाऊ नये यासाठी आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच नोकरदारांना पूर्ण वर्षाचे प्लॅनिंग करून डिक्लेरेशन द्यावे लागते. म्हणजेच कशामध्ये गुंतवणूक करून कर वाचवाल याची माहिती द्यावी लागते. याप्रमाणे HR कराचे कॅलक्यूलेशन करून तुमच्या पगारातून कोणता कर कापला जाणार नाही याबद्दल नमूद करतो. हे सर्व डिसेंबरपर्यंत चालते. त्यानंतर जानेवारीमध्ये HR कडून डीक्लेरेशनचे पुरावे सादर करण्याचा मेल येतो. जर तुम्ही पुरावे सादर करू शकला नाहीत तर तुम्ही कशातही गुंतवणूक न केल्याचे सिद्ध होते आणि उर्वरित 3 महिन्याच्या पगारातून संपूर्ण वर्षाचा कर कापून घेतला जातो. साहिलने वर्षाच्या सुरुवातीलाच दीड लाख रुपये गुंतवणूक करण्याचे सांगितले परंतु केली नाही.

आता साहिलसमोर तीन प्रश्न उभे राहिले आहेत

पहिला प्रश्न , साहिल कर कसा वाचवू शकतो ? कर कपात वाचवण्यासाठी साहिलने गुंतवणुकीची कमिटमेंट दिली आहे टी पूर्ण करावी लागेल. HR मध्ये कराचे पुरावे सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. जर साहिलकडे दीड लाख रुपये असतील तर गुंतववून पुरावे सादर करू शकतो.

दूसरा प्रश्न ,संपूर्ण वर्षात गुंतवणूक केली नसेल तर शेवटच्या तीन महिन्यात कुठे गुंतवणूक करू शकतो ? साहिल कर वाचवण्यासाठी आयकर कलम 80C आणि 80D अंतर्गत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये 80C अंतर्गत 2 मुलांची शिक्षणाची फी, PF, नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट , सुकन्या समृद्धी योजना, PPF, जीवन विमा प्रीमियम, इक्विटी लिंक्ड सेव्हींग स्कीम, गृहकर्जाचा EMI मधील मूळ रकमेचा हिस्सा याचा समावेश आहे. तर 80D अंतर्गत आरोग्य विमा पॉलिसीचे 25 हजार रुपये आणि आई-वाडिलांसाठी आरोग्य विमा खरेदीवर 25 हजारपर्यंतच्या प्रीमियमवर एकूण मिळून 50 हजार ची अतिरिक्त कर बचत करता येते. जर साहिलकडे दीड लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी नसतील तर संपूर्ण वर्षाचा कर शेवटच्या 3 महिन्यात कापला जाईल.

तिसरा प्रश्न , हा कर कापून पगार हातात मिळाल्यास काय करावे? जर साहिलने गुंतवणुकीचे पुरावे सादर केले नाहीत तर त्याचा कर कापला जाईल. पण कर कपातीनंतर देखील साहिलने 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक पूर्ण केली तर ITR भरून टॅक्सचा रिफंड मिळू शकतो

चला या वर्षी तर कर वाचवता येईल. परंतु हे दर वर्षी होऊ नये यासाठी आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलच टॅक्स प्लॅनिंग सुरू करावे. गुंतवणुकीसाठी वाट बघू नका. थोडी थोडी गुंतवणूक केली तरीही त्यातून चांगला परतावा मिळेल आणि गुंतवणुकीचं ओझं देखील राहणार नाही.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.