करदात्यांसाठी खूशखबर! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ
जर तुम्ही अद्याप तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर काहीही चिंता करु नका. कारण सरकारने इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
मुंबई : जर तुम्ही अद्याप तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर काहीही चिंता करु नका. कारण सरकारने इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 31 ऑगस्टपर्यत तुम्हाला इनकम टॅक्स भरता येणार आहे. अर्थमंत्रालयाने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे.
यापूर्वी सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत डेडलाईन दिली होती. मात्र अनेक करदात्यांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी याआधी 31 मे ही तारीख दिली होती. मात्र या मुदतीत वाढ करत ती 30 जून करण्यात आली होती. याशिवाय फॉर्म 16 भरण्याच्या मुदतीतही वाढ करत ती 31 जुलै करण्यात आली होती. यापूर्वी फॉर्म 16 भरण्याची 15 जून ही तारीख होती. दरम्यान अनेकांनी इनकम टॅक्स भरण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या फॉर्म 16 उपलब्ध नसल्याचे कारण दिले होते. त्यामुळे टॅक्स भरण्यास उशीर होत असल्याचे अनेकांनी सांगितले. हे लक्षात घेऊन सरकारने इनकम टॅक्स भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
The categories of taxpayers includes all taxpayers who were liable to file their Income Tax Returns by 31st of July, 2019 & can now file their Income Tax Returns by 31st of August, 2019.
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 23, 2019
दरम्यान जर कोणत्याही करदात्याने मुदतीनंतर इनकम टॅक्स भरला नाही, तर त्याला 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली जाते. मात्र त्यासोबत त्याला 5000 विलंब शुल्कही आकारले जाते. तसेच जर एखाद्या व्यक्तीने 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत इनकम टॅक्स भरला, तर त्याच्याकडून 10,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाते.
संबंधित बातम्या :