Lic Agents | 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट, अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Sep 18, 2023 | 6:18 PM

केंद्र सरकारने एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेऊन सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठी भेट दिली आहे.

Lic Agents | 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट, अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
lic
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय जीवन विमा निगम ( एलआयसी ) च्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी ग्रॅच्युईटी मर्यादा आणि पारिवारिक पेंशन वृद्धीसहीत अनेक कल्याणकारी निर्णय सोमवारी वित्त विभागाने घेतले आहेत. एलआयसी ( एजंट ) अधिनियम 2017 मध्ये सुधारणा, ग्रॅच्युएटी मर्यादेत वाढ आणि कुटुंब पेंशनचे समान दर याबाबत निर्णय घेतले आहेत.

केंद्र सरकारने एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेऊन सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने एलआयसी एजंटसाठी ग्रॅज्युईटीची मर्यादा तीन लाखांहून पाच लाखांपर्यंत करण्यास मंजूरी दिली आहे. याचा हेतू त्यांच्या काम आणि मिळणारे लाभ यात योग्य सुधारणा करणे हा आहे. नोकरीवर पुन्हा घेतलेल्या एजंटना नूतनीकरण कमिशन अंतर्गत पात्र ठरण्याची तरतूद आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार होणार आहे.

विमा कव्हर आणि पेंशनमध्ये वाढ

सध्या एलआयसी एजंटना जुन्या एजन्सीनूसार पूर्ण केलेल्या कामाचे नवीन कमिशन दिले जात नाही. एजंटना फिक्स विमा कव्हर म्हणून 3,000-10,000 रुपयांवरुन वाढवून 25,000-1,50,000 रुपये केले आहे. फिक्स विमा कव्हरमुळे मृत्यू पावलेल्या विमा एजंटाच्या कुटुंबियांना लाभ होईल. तसेच एजंटाच्या कुटुंबियांसाठी 30 टक्क्यांची एक समान दरावर कौटुंबिक पेन्शनला मंजूरी दिली आहे.

कर्मचाऱ्यांना फायदा होणार

सरकारने म्हटले आहे की 13 लाखांहून अधिक एजंट आणि एक लाखाहून अधिक नियमित कर्मचाऱ्यांना या कल्याणकारी योजनेचा फायदा होईल. ज्यामुळे एलआयसीचा विकास आणि वाढ होईल. साल 1956 मध्ये पाच कोटीच्या भांडवलाने स्थापना झालेल्या एलआयसीजवळ 31 मार्च 2023 पर्यंत 40.81 लाख कोटी रुपयांच्या लाईफ इंश्युरन्ससह 45.50 लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीची निर्मिती केली आहे.