नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून (PM Kisan Samman Nidhi scheme) अयोग्य लाभार्थ्यांना म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना खरंच या योजनेची गरज नाही, अशा 20 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पैसे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत जुलै 2020 पर्यंत जवळपास 1364 कोटी रुपये अयोग्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालं आहे (Govt distributed 1364 crores to undeserving beneficiaries).
नियमानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे. दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेला शेतकरी किंवा टॅक्सपेअर शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. कृषी मंत्रालयाने अयोग्य लाभार्थ्यांची दोन भागात विभागणी केली आहे. पहिल्या भागात 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेला शेतकरी तर दुसऱ्या भागात टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्याची विभागणी करण्यात आली आहे.
सरकार सर्व पैसे परत मिळवणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेस पात्र नसलेल्या 20 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे केंद्र सरकार रिकव्हर करणार आहे. कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारातून दिलेल्या माहितीनुसार त्या 20 लाख शेतकऱ्यांमध्ये पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि महाराष्ट्राचे शेतकरी आहेत. यापैकी पंजाबचे शेतकरी सर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातचा नंबर लागतो. तर सिक्किममध्ये फक्त एक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरलेला आहे (Govt distributed 1364 crores to undeserving beneficiaries of PM Kisan Samman Nidhi scheme).
केद्र सरकारने 2019 साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला केंद्र सरकार वर्षभरात सहा हजार रुपये देते. पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणं आवश्यक आहे.
आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….
सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, यादीतील तुमचं नाव आजच चेक करा!